esakal | 'न्याय' टीझर रिलीज; सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाचा होणार उलगडा

बोलून बातमी शोधा

new movie nyay teaser released film death case sushant singh rajput

सुशांत सिंग राजपुत आत्महत्या प्रकरणाचा होणार 'न्याय': ट्रेलर व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुत याच्या आत्महत्या प्रकरणाचा उलगडा आता एका चित्रपटाच्या माध्यमातून होणार आहे. त्या चित्रपटाचा टीजर आता सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. त्याला सुशांतच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. त्या चित्रपटाचे नाव 'न्याय ; द जस्टिस' (Nyay : The Justice) असे आहे. त्यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या भूमिकेत जुबेर दिसणार आहे. तर श्रेया ही रिया चक्रवर्तीची भूमिका करणार आहे. तर असरानी हे सुशांतच्या वडिलांची भूमिका करणार आहे. हा चित्रपट 11 जूनला प्रदर्शित होणार आहे. त्याच्या आत्महत्येला एक वर्ष होण्यापूर्वी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

विकास प्रॉडक्शननं या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर आज प्रदर्शित करण्यात आला. त्याला सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. त्यातून सुशांतच्या आत्महत्येच्या नेमक्या कोणत्या गोष्टींवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सुशांत सिंगचा च्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनही यानिमित्तानं उजेडात आलं होतं. त्यात बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांचे नाव समोर आले होते. त्यांची चौकशीही झाली होती.

आता सोशल मीडियावर जो टीझर प्रदर्शित झाला आहे तो 58 सेकंदांचा आहे. त्याची सुरुवात लक्षवेधी आहे. विकास प्रॉडक्शनच्या अंतर्गत ही सुरुवात करण्यात आली आहे. टीझरच्या सुरुवातीला प्रसिध्द अभिनेता महिंदर सिंग याच्या आत्महत्येची बातमी प्रसिध्द होताना दिसते. ती त्यावेळची ब्रेकींग न्युज असल्यानं सर्वांच्या नजरा त्याकडे जातात. जसजसा टीझर पुढे जातो त्यावेळी सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाचे कुतूहल वाढायला लागते. हैराण - परेशान चा अभिनेता आता आपल्या समोर येमार आहे अशीही सुरुवात यावेळी पाहायला मिळते. आतापर्यत वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. मात्र कुणाच्या तपासातून ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अद्याप सुशांत सिंगच्या आत्महत्याच्या प्रकरणाचा उलगडा झालेला नाही.

एनबीटीमध्ये प्रसिध्द झालेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक दिलीप गुलाटी यांनी सांगितले की, सुशांतच्या आत्महत्येनंतर मला मोठा धक्का बसला होता. मी त्याला वैयक्तिकरीत्या ओळखत नाही. मात्र त्याच्या जाण्यानं कोणी आपलचं गेलं आहे अशी भावना माझी झाली होती. चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये एक संदेश पाठवू इच्छितो ज्यातून लोकांना सांगणार आहोत की आत्महत्या हा काही उपाय नाही. हा चित्रपट त्या अभिनेत्यासाठी श्रध्दांजली असणार आहे.