
मुंबई - कंगणाची ज्या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता होती त्याचा ट्रेलर कंगणाच्या वाढदिवशी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याला मिळालेला प्रचंड प्रतिसाद सर्वांनी पाहिला. आता कंगणानं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक वेगळा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. कंगणाची अपकमिंग फिल्म 'थलाइवी' 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी थलाइवीच्या प्रमोशनसाठी एक आगळी वेगळी शक्कल लढवली आहे. काय आहे ती भन्नाट आयडिया जाणून घेऊया. कंगणानं सोशल मीडियावर तशा प्रकारची एक पोस्ट शेअर केली आहे. तिची योजना यशस्वी होणार का हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
कंगणानं जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तिनं म्हटलं आहे की, सर्वांना होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा. होळीच्या दिवशी एक गोष्ट मला तुमच्याशी शेअर करायची आहे. तुम्हाला माहिती असेलच जयाजी यांनी आपलं सारं आयुष्य लोकांसाठी व्यतीत केलं. त्यांची सेवा केली. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण केले. सर्वसामान्य लोकांची मनं जिंकून घेतली. सुरुवातीला अभिनयाच्या माध्यनातून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. दुसरीकडे राजकारणात आल्यावर त्यांनी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या मोठ्या प्रमाणावर यशस्वीही झाल्या. माझ्या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांना उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जयाजी यांचं राजकारणाला असलेलं योगदान लक्षात घेऊन आमच्या टीमनं प्रमोशनसाठी एक खास गोष्ट करायचं ठरवलं आहे. जयाजी यांची क्वालिटी अशी आहे की त्या आपल्या प्रभावानं लोकांच्या मनात स्थान निर्माण करतात. आता आम्ही एक कँम्पेन लाँच केले आहेत. त्यातील सर्व निर्णय हे तुम्ही घेणार आहात. त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांना असे सांगायचे आहे की, तुम्ही सर्वांनी त्यात भाग घ्या. #VoteForThalaivi च्या प्रमोशनची तयारी करा. आणि आम्हाला सहकार्य करा. असे कंगणानं म्हटलं आहे. तिनं केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
ए.एल विजय यांचे दिग्दर्शन असलेली थलाइवी नावाची फिल्म पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर कंगणाच्या जन्मदिनी प्रदर्शित करण्यात आला होता. त्याला कोटयवधी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. चाहते हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची वाट पाहत आहेत. ज्यावेळी त्या ट्रेलरचे लाँचिंग करण्यात आले त्यावेळी कंगणा दिग्दर्शकाबद्दल कमालीची भावूक झाली होती. त्यांनी दिग्दर्शक ए.एल.विजय यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला होता.
कंगणा म्हणाली होती की, मी यापूर्वी अशा कोणत्याही व्यक्तीला भेटले नव्हते की ज्यानं आपल्या टँलेटनं मला दखल घेण्यास भाग पाडलं होतं. मी आता जरा भावनिक होत आहे. मात्र त्याला कारणही तसचं आहे. फार कमी वेळा मी अशा परिस्थितीतून जाते. मला अशा व्यक्तीविषयी तुम्हाला सांगायचे आहे की ती व्यक्ती माझ्यासाठी खूपच महत्वाची आहे. फार कमीवेळा अशाप्रकारची माणसं पाहायला मिळतात. त्यांच्याकडून मला शिकायला मिळाले की, लोकांना कशाप्रकारे वागणूक द्यायला हवी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.