Tue, Sept 26, 2023

New Parliament : संसदेची इमारत नवी, पण भारताच्या गौरवाचं स्वप्न जुनं; किंग खानने शेअर केला व्हिडीओ
New Parliament : संसदेची इमारत नवी, पण भारताच्या गौरवाचं स्वप्न जुनं; किंग खानने शेअर केला व्हिडीओ
Published on : 28 May 2023, 2:09 am
संसदेच्या नव्या भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. भारतीय परंपरेचं प्रतिक असलेला सेंगोल आज या भवनात स्थापन केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अभिनेता शाहरुख खान याने संसद भवनाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
हा व्हिडीओ ट्वीट करताना शाहरुख खान म्हणतो, "जे लोक आपल्या संविधानाचे समर्थन करतात, या महान राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाचे प्रतिनिधित्व करतात आणि लोकांच्या विविधतेचे रक्षण करतात त्यांच्यासाठी हे किती भव्य नवीन भवन आहे. नवीन भारतासाठी संसदेची इमारत, पण भारताच्या गौरवाचे जुने स्वप्न. जय हिंद"
संसदेच्या नव्या इमारतीचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला विविध पीठांचे साधू तसंच विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते.