'लक्ष्मी बॉंम्ब' नव्हे तर ''लक्ष्मी''चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये कियाराचा नवा अंदाज 

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 31 October 2020

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

मुंबई - अखेर लोकांच्या भावनांचा सन्मान ठेवत अक्षयने आपल्या चित्रपटाचे नाव बदलले. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून त्याला मोठ्या प्रमाणात वादाला सामोरे जावे लागले होते. करणी सेनेनं तर याप्रकरणावरुन कायदेशीर नोटीस पाठवली होती. नाव बदलेल्या या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटातील अभिनेत्री कियरा अडवाणीच्या लुकवर चाहते फिदा झाले आहेत.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

नुकताच अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘लक्ष्मी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत ‘आता प्रत्येक घरात येणार लक्ष्मी. ९ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसोबत तयार रहा’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

करणी सेना अक्षयच्या नव्या चित्रपटाबाबत आक्रमक झाली  आहे. यासाठी त्यांनी अक्षयला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.  गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार याने एका व्हिडीओच्या माध्यमातून बॉलीवूडमधील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले होते. तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता.

श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी ही नोटीस पाठवली आहे. चित्रपट निर्मात्यांनी जाणूनबुजून ‘लक्ष्मी’ हे नाव शीर्षकात वापरल्याचा उल्लेख या नोटिशीत केला आहे. हिंदू धर्मातील देवदेवतांचा अपमान केल्यामुळे भावना दुखाविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लक्ष्मी देवतेच्या नावाचा अवमान त्यात झाला आहे.  असा मुख्य आरोप करणी सेनेनं केला आहे.  
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new photo look released of actress Kiara Advani in laxmi movie