योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत नवा ट्विस्ट.. असं होणार रक्षाबंधन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

new twist in yogyogeshwar jai shankar serial on colors marathi srushti pagare entry

योगयोगेश्वर जय शंकर मालिकेत नवा ट्विस्ट.. असं होणार रक्षाबंधन..

सध्या पौराणिक मालिकांमध्ये कलर्स मराठी वाहिनी सगळ्यात अग्रेसर दिसत आहे. या वाहिनीवर आता तीन पौराणिक मालिका एकाच वेळी सुरु आहेत. 'जय जय स्वामी समर्थ' आणि 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या हिट मालिकांसोबत 'योगयोगेश्वर जय शंकर' ही नवी पौराणिक मालिका काही महिन्यांपूर्वी कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. अवघ्या काही दिवसात या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. दिवसेंदिवस या मालिकेत नवा ट्विस्ट येत आहे. आता रक्षाबंधन विशेष भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे.

(new twist in yogyogeshwar jai shankar serial on colors marathi srushti pagare entry)

श्रावण महिना म्हटलं कि, अनेक सण समारंभ, व्रतवैकल्ये, पूजाविधी यांची रेलचेल असते त्यात सगळयांचा लाडका सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवसाची वाट आपण सगळेच बघत असतो . याच बरोबर येते संततीरक्षणार्थ केली जाणारी जिवतीची पूजा,या पूजेचे महत्व देखील काही खास आहे. लवकरच कलर्स मराठीवरील योगयोगेश्वर जय शंकर मालिकेमध्ये जिवतीची पूजा आणि रक्षाबंधन विशेष भाग बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये याचे महात्म्य देखील गोष्टी रूपात सांगितले जाणार आहे. याचसाठी मालिकेत एक विशेष एंट्री होणार आहे. कलर्स मराठीवरील स्वामिनी मालिकेत रमा बनून मराठी मनावर जिने अधिराज्य गाजवले, सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमातून जिने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले अशी आपल्या सगळयांची लाडकी "सृष्टी पगारे" मालिकेत पावनीची महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

मालिकेमध्ये बाळ शंकर राहत असलेल्या गावामध्ये एक महसूल अधिकारी आणि त्यांचे कुटुंब राहायला येणार असून त्यांचीच मुलगी पावनी. जिचा विश्वास आहे तिचा भाऊ परत येणार आहे असे तिला भास देखील होत आहेत. आता पावनीचे हे भास खरे आहेत का ? तिची तिच्या भाऊरायाशी भेट होईल का ? बाळ शंकर यात तिची मदत कशी करतील ? हे सगळे मालिकेच्या रक्षाबंधन विशेष भागांमध्ये बघायला मिळणार आहे.

याबद्दल बोलताना सृष्टी म्हणाली, "मी या भूमिकेसाठी खूपचं उत्सुक आहे. कारण या मालिकेद्वारे मी पुन्हाएकदा कलर्स मराठी परिवाराशी जोडली जाणार आहे. पुन्हा त्याच सोनेरी आठवणी समोर येत आहेत. तसंच आरुषसोबत काम करायला मिळतं आहे माझं भाग्य आहे. कामाबरोबर बरीच धम्माल मस्ती देखील सुरु असते आमची सेटवर. जसं रमा या भूमिकेवर संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम केलं तसंच पावनीवर देखील करा आणि आमची मालिका नक्की बघा".

Web Title: New Twist In Yogyogeshwar Jai Shankar Serial On Colors Marathi Srushti Pagare Entry

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..