esakal | डोळ्यावर पट्टी बांधून केली तलवारबाजी ; विद्युत जामवालचा व्हिडिओ व्हायरल 
sakal

बोलून बातमी शोधा

new video of vidyut jamwal viral on social media superhit

विद्युतची गेल्या काही महिन्यांपूर्वी खुदा हाफिज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

डोळ्यावर पट्टी बांधून केली तलवारबाजी ; विद्युत जामवालचा व्हिडिओ व्हायरल 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रख्यात अॅक्शन अभिनेता विद्युत जामवाल याच्यासाठी काहीही अवघड नाही. आपल्या अनोख्या अंदाजासाठी तो सोशल मीडियावर प्रसिध्द आहे. त्याच्या फॅन फॉलोअर्सची संख्याही मोठी आहे. सध्या बॉलिवुडमध्ये जे काही अॅक्शन हिरो आहेत त्यापैकी विद्युत जामवाल याचा क्रमांक वरचा आहे. त्यानंतर टायगर श्रॉफचे नाव घ्यावे लागेल. नुकताच त्याच्या एका हटक्या अॅक्शन व्हिडिओची क्लिप व्हायरल झाली आहे.

आपल्या चित्रपटांमध्ये स्वतच स्टंट द्यायची पध्दत काही नवी नाही. यापूर्वी अजय देवगण आणि अक्षय कुमार हे त्यांच्या अॅक्शनसाठी प्रसिध्द आहे. सध्या विद्युतच्या एका नव्या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. त्यात त्यानं केलेला स्टंट प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेला आहे.विद्युत जामवालला कंट्री बॉय म्हणूनही ओळखले जाते. ती त्याची वेगळी ओळख आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या अॅक्शन पध्दतीमुळे तो सर्वांच्या आवडीचा अॅक्शन हिरो आहे. मागे काही वर्षांपूर्वी विद्युतनं असेच एक चॅलेंज पुर्ण केले होते. त्याच्या अशाप्रकारच्या अॅक्शनला पाहणारा वर्ग मोठा आहे.

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात त्यानं डोळ्यावर पट्टी बांधली आहे. आणि तो तलवारबाजी केली आहे. याविषयी तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल. द रिचेस्ट नावाच्या एका पोर्टलनं यादी तयार केली आहे. त्यात रशियाचे राष्ट्रपती पुतिन, विश्व प्रसिध्द साहसीवीर बेअर ग्रील यांच्या नावाबरोबर विद्युत जामवाल हा एकमेव असा अभिनेता आहे की ज्याचे त्या यादीत नाव आहे. अशा विद्युतच्या त्या व्हिडिओला प्रसिध्दी मिळाला नसती तर नवल म्हणावे लागेल.

विद्युतची गेल्या काही महिन्यांपूर्वी खुदा हाफिज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. जम्मु मध्ये जन्माला आलेल्या विद्युतनं मार्शल आर्टस् चे ट्रेनिंग घेतले आहे. त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यानं स्वतच अॅक्शन सीन दिले आहेत. ही त्याची वेगळी ओळख आहे. त्याने केवळ बॉलिवूडमध्ये नव्हे तर टॉलीवूड आणि कॉलीवूडमध्येही एक्शन सीन दिले आहे. चित्रपटांबरोबर त्याची आता सध्या दिल्लगी आणि गल बन गई ही गाणी कमालीची लोकप्रिय झाली आहे. 
 
 

loading image