न्युयॉर्क टाइम्सच्या स्क्वेअरवर ' रामचरण'; फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

new yorks times square lights up images of ram charan photos go viral
new yorks times square lights up images of ram charan photos go viral
Updated on

मुंबई - केवळ बॉलीवूडच नाही तर टॉलीवूडच्या अभिनेत्यांचाही जगभरात मोठा गवगवा आहे. साऊथच्या मुव्हीजला त्याठिकाणी मिळणारा प्रेक्षकवर्ग प्रचंड आहे. आता एक खास कारणानं टॉलीवूड पुन्हा चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे साऊथ मधला सुपरस्टार रामचरण याच्या वाट्याला मोठं कौतूक आलं आहे. यापूर्वी दुबईतील बुर्ज खलिफा टॉवरवर शाहरुखचा फोटो झळकला होता. आता रामचरण अमेरिकेत झळकला आहे. त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. अमेरिकेतील प्रसिध्द टाईम्स स्क्वेअरमध्ये रामचरणचे पोस्टर झळकल्यानं त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

 रामचरणच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अशाप्रकारे त्याला शुभेच्छा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. चेन्नईमध्ये जन्माला आलेल्या रामचऱणनं जगन्नाथ यांच्या चिरुथा नावाच्या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. रामचरण हा तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश कलाकारांपैकी एक आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार राम चरण आपल्या दमदार भूमिकेसाठी ओळखला जातो. त्याशिवाय तो त्याच्या स्टायलिश लुकसाठीही प्रसिध्द आहे.

रामचरण हा साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा आहे. त्याचा जन्मदिवस काल उत्साहात साजरा केला गेला. वेगळ्या धाटणीचा कलावंत म्हणूनही रामचरणची ओळख आहे. सोशल मीडियावर त्याचा फॅन फॉलोअर्स मोठा आहे. आपल्या आगळ्या पध्दतीच्या स्टाईलनं त्यानं मोठा प्रेक्षकवर्ग तयार केला आहे. त्याला मिळणारं प्रेम आणि प्रतिसाद मोठा आहे. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे त्याचा टाईम्स स्क्वेअरवर झळकलेला फोटो. हे सांगता येईल. अमेरिकेतील टाईम्स स्क्वेअर मधील नेस्डेक इमारतीवर मेगा पॉवरस्टार रामचरण़चे फोटो लागला आहे.

रामचरण लवकरच राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातून दिसणार आहे. त्यात त्यानं अल्लुरी सीता रामाराजू नावाची एक भूमिका केली आहे. हा चित्रपट एक पीरियड ड्रामा आहे.  तो चित्रपट कोमाराम भीम आणि अल्लुरी सीतारामा राजू नावाच्या स्वातंत्र्य सैनिकांवर आधारित आहे. त्यात आलिया भट्ट आणि अजय देवगणही काम करणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील आलियाचा सीताचा लूक व्हायरल झाला होता. त्यालाही नेटक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com