esakal | राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे अधिकारी किरण धिवार कालवश
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे अधिकारी किरण धिवार कालवश

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे अधिकारी किरण धिवार कालवश

sakal_logo
By
युगंधर ताजणे

पुणे : एनएफआय (राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, पुणे) मध्ये चित्रपट जतन अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या किरण धिवार यांचे निधन झाले आहे. ते 53 वर्षांचे होते. पुण्यातील विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या धिवार यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. एनएफआय संस्थेसाठी त्यांचे असणारे योगदान मोठे होते. त्यांनी अखंडपणे आपल्या सेवाभावी वृत्तीतून संस्थेच्या वैभवात वाढ केली. (nfai film preservation officer kiran dhiwar passed away yst88)

गेल्या काही दिवसांपासून धिवार यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. गेल्या तीस वर्षांपासून त्यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात नोकरी केली. ते आपल्या प्रेमळ स्वभावामुळे सर्वांमध्ये प्रिय होते. सहकार्यशीलता हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एप्रिल १९९१ मध्ये सर्वप्रथम ते व्हिडिओ टेक्निशियन म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली.

हेही वाचा: नवरोबांच्या 'उद्योगामुळे' रडकुंडीला आलेल्या अभिनेत्री...

हेही वाचा: #MeToo: वडिल अनुराग कश्यप यांच्यावरील आरोपावर आलियाची प्रतिक्रिया

१ जून १९९८ मध्ये धिवार हे चित्रपट जतन अधिकारी झाले. व्हिडीओ कॅसेट, डीव्हीडी, डिजिटल याबद्दल त्यांना विशेष माहिती होते. त्यात त्यांना रुची होती. एनएफआय या संस्थेतील वेगवेगळ्या बदलांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या निधनावर एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदूम यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, धिवार यांना एनएफएआयमधील चित्रपट संकलनाबद्दल परिपूर्ण ज्ञान होते. त्यांनी विविध चित्रपट प्रॉडक्शन हाऊसशी चांगले संबंध निर्माण केले. त्याचा फायदा एनएफएआयला झाला.

loading image