
निया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोशुटमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर असणारा फॅनबेसही मोठा आहे.
मुंबई - छोट्या पडद्यावर काम करणारी प्रसिध्द अभिनेत्री निया शर्मा सोशल चर्चेत आली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरुन ती मोठया प्रमाणात व्हायरल होत आहे. नियानं एक शानदार लक्झरी गाडी खरेदी केली आहे. त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड करण्याचा मोह तिला काही आवरला नाही.
निया ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या फोटोशुटमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर असणारा फॅनबेसही मोठा आहे. तिनं नवीन लक्झरी कार घेतल्याचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये निया ही आपल्या नव्या गाडीवरील कव्हर हटवताना दिसत आहे. आपल्या नव्या गाडीसोबत निया भलतीच खुश असल्याचे दिसून आले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. फॅन्सकडून लाईक आणि शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.
नियानं खरेदी केलेली नवी कार ही व्होल्वो एक्ससी 90 डी 5 इंस्क्रिप्शन आहे. ज्याची किंमत 87.98 लाख एवढी आहे. त्या कारच्या फोटोसह एक कॅप्शनही नियानं दिली आहे. तिनं लिहिले आहे की, तुम्ही आनंद खरेदी करु शकत नाही. मात्र तुम्ही कार नक्कीच खरेदी करु शकता. या दोन्ही गोष्टी एकसारख्याच आहेत. नियाच्या या पोस्टवर रवि दुबे, आमिर अली, अर्जुन बिजलानी, गीता फोगाट, आशा नेगी, शांतनू माहेश्वरी यासारख्या कलाकारांनी कमेंट केली आहे. काली या मालिकेतून नियानं मनोरंजनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर तिनं एक हजारों में मेरी बहना है, या मालिकेतून दिसली होती. ज्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. रवी दुबे याच्याबरोबर ती जमाई राजा नावाच्या मालिकेतही चमकली होती.
प्रेक्षकांचे मनोरंजन करणे, त्यांना निखळ आनंद देणे यासाठी निया आपल्या भूमिका साकारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही दिसून आले आहे. मागील वर्षी तिनं खतरो के खिलाडीमधून एक ट्रॅाफीही जिंकली होती. आता सध्या ती जमाई राजा या मालिकेच्या दुस-या सीझनमध्ये काम करत आहे.