प्रियांका आणि निक जोनास ‘या’ हॉलिवूडपटात पहिल्यांदाच येणार एकत्र

दिपाली राणे-म्हात्रे
Thursday, 10 December 2020

लंडनमध्ये निक आणि प्रियांकाला या सिनेमाचं शूटींग करत असताना पाहण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबई- बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा बॉलीवूडमध्ये प्रसिद्धी मिळवल्यानंतर हॉलिवूडमध्ये तिच्या डंका वाजवण्यात यशस्वी ठरली. प्रसिद्ध अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्न केल्यानंतर प्रियांका विदेशातही सातत्याने चर्चेत आहे. यामध्येच या दोघांचं खाजगी आयुष्य देखील तितकंच चर्चत आहे. त्यामुळे या दोघांनी मोठ्या पडद्यावर एकत्र यावं अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. दोघांनी एकत्र सिनेमा किंवा गाण्यामध्ये पाहण्याची इच्छा चाहत्यांनी अनेकदा व्यक्त केली होती. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा दोघंही लवकरच पूर्ण करणार आहेत. 

हे ही वाचा:  'श्रीकांत बशीर'मध्ये अभिनेता गश्मीर महाजनीची वर्णी   

प्रियांका आणि निक एका आगामी हॉलिवूडपटात एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर प्रियांकाने तिचा मोर्चा हॉलिवूडपटांकडे वळवला आहे. लवकरच प्रियांका ‘टेक्स्ट फॉर यू’ या सिनेमात झळकणार आहे. विशेष म्हणजे तिच्या या आगामी सिनेमात पती निक जोनास देखील झळकणार असल्याचं कळतंय. टेक्स्ट फॉर यू’ या हॉलिवूडपटात निक कॅमियो रोलमध्ये झळकणार आहे.

लंडनमध्ये निक आणि प्रियांकाला या सिनेमाचं शूटींग करत असताना पाहण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 'टेक्स्ट फॉर यू' या सिनेमाच्या माध्यमातून निक पहिल्यांदाच प्रियांकासोबत काम करणार आहे. त्यामुळे या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मात्र असं असलं तरी निकच्या भूमिकेविषयी प्रियांका किंवा निककडून अजुन कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.   

nick jonas will be seen with wife priyanka chopra in her upcoming hollywood film    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nick jonas will be seen with wife priyanka chopra in her upcoming hollywood film