esakal | 'चूकीला माफी नाहीच', पण शिल्पाचं नाव का? निकीताचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

nikita rawal

'चूकीला माफी नाहीच', पण शिल्पाचं नाव का? निकीताचा प्रश्न

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर राजच्या विरोधात अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले आहेत. त्यात काही मॉडेल आणि अभिनेत्री आहे. त्यांचे म्हणणे असे की, यासगळ्या प्रकारात राजनं आम्हाला पैशांचे आमिष दाखवून पॉर्न व्हिडिओ तयार करण्याचे काम केले. त्याच्या पीएनं आपल्याला ऑफर दिल्याची तक्रार एका अभिनेत्रीनं केली आहे. यामुळे हे प्रकरण वेगळ्या दिशेने जाताना दिसत आहे. (nikita rawal opens up raj kundra says must be clean but shilpa shetty name being forcibly pulled yst88)

आता राजच्या प्रकरणात अभिनेत्री आणि मॉडेल निकिता रावलनं उडी घेतली आहे. तिनं म्हटलं आहे की, कुणी एखाद्यानं गुन्हा केला असेल तर त्याच्या चूकीला माफी नाहीच. मात्र आताच्या प्रकरणात शिल्पा शेट्टीचे नाव घेतले जात आहे. तिच्या नावाची बदनामी होताना दिसते आहे. यासगळ्य़ात तिची चूक काय, हे लोकांना माहिती नाही का, तिचा सहभाग अजून यात दिसून आलेला नाही. तरीही लोकं तिचे नाव घेत आहे. हे चूकीचे आहे. आपण तिच्या पाठीशी आहोत असं तिनं सांगितलं आहे.

अश्लील व्हिडिओ तयार करुन ते एका अँपच्या माध्यमातून व्हायरल करण्याचा आरोप राजवर आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली आहे. एकीकडे काही लोक राजच्या चूकीचं समर्थन करत आहेत. दुसरीकडे शिल्पाच्या नावाची चर्चाही लोकं करु लागले आहेत. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर राज आणि शिल्पाच्या नावाची चर्चा आहे.

हेही वाचा: 'चुना लावला वाटतं'; मेकअपमुळे श्रुती मराठे ट्रोल

हेही वाचा: ऑलिम्पिकची तयारी सुरुयं? 64 वर्षांच्या 'मजनूभाईला' चाहत्यांचा प्रश्न

निकितानं दिलेल्या प्रतिक्रियेत असं म्हटलं आहे की, मी राजला दोन ते तीनवेळा भेटली आहे. माझे भेटणे इव्हेंटच्या संदर्भात होते. आणि आमचे काही कॉमन फ्रेंडही आहेत. मात्र मला असे वाटत नाही की, तो असे काही करेल. जेव्हापासून मी बातम्या वाचत आणि पाहत आहे तेव्हापासून मोठ्या धक्क्यात आहे. मुंबई पोलिसांकडे सगळे पुरावे आहेत. असे ते म्हणतात. मुंबई पोलिस हे बेस्ट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेता येणार नाही. मात्र शिल्पाचे नाव घेतले जात आहे, असा माझा प्रश्न आहे.

loading image