निक्की तंबोलीने जान सानूवर लावले जबरदस्ती किस करत असल्याचे आरोप, जाननेही केला पलटवार

दिपाली राणे-म्हात्रे
Friday, 13 November 2020

'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धकांना एकमेकांच्या संमतीने अशा दोन सदस्यांचं नाव घ्यायचं होतं ज्यांना त्यांना जेलमध्ये पाठवण्याची इच्छा आहे. यावर निक्की तंबोली जान कुमार सानूचं नाव घेते आणि त्याच्यावर असा आरोप लावले की जे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो

मुंबई-  'बिग बॉस'मध्ये स्पर्धकांमध्ये भांडणं होणं हे काही नवीन नाही . कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरुन स्पर्धकांमध्ये तु तु मै मै होतंच असते. नुकतंच शोच्या थीमनुसार 'बिग बॉस'चा सीन पुन्हा एकदा पलटताना दिसला. 'बिग बॉस १४' च्या घरातुन नुकतंच रेड झोन हटवलं गेलं ज्याची जागा आता पिंज-याने घेतली आहे. 'बिग बॉस'च्या घरातील स्पर्धकांना एकमेकांच्या संमतीने अशा दोन सदस्यांचं नाव घ्यायचं होतं ज्यांना त्यांना जेलमध्ये पाठवण्याची इच्छा आहे. यावर निक्की तंबोली जान कुमार सानूचं नाव घेते आणि त्याच्यावर असा आरोप लावले की जे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. 

हे ही वाचा: प्रभुदेवा दुसरं लग्न करण्याच्या तयारीत? जाणून घ्या कोणाला करतायेत डेट  

निक्की तंबोली सांगते, तिला जान कुमार सानूला यासाठी जेलमध्ये पाठवायचं आहे कारण तो तिला विनाकारण तिच्या मर्जीशिवाय तिला किस करतो. निक्की सांगते, 'मला माहित आहे हे खूप शॉकिंग आहे पण मला जानला जेलमध्ये पाठवायचं आहे. कारण मी अनेकदा नकार देत असतानाही तो मला किस करतो. मी एकदा नाही अनेकदा त्याला या गोष्टीसाठी मनाई केली आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors TV (@colorstv)

निक्कीचं हे कारण ऐकून घराचा कॅप्टन अली गोनी अत्यंत वाईट प्रकारे जान कुमार सानुवर भडकतो. अली म्हणतो, 'जर ती तुला स्पष्टपणे नकार देतेय तरीही तु तिच्यामागे लागतोस. जे मला आवडत नाही. जर कोणी तुला नकार देतंय जर तुला समजायला हवं.' यावर जान सानुने उत्तर देत म्हटलं की 'जर तिला आवडत नाही तर ती पलटून लगेच मला किस का करते?' बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांच्या या वक्तव्यांमुळे प्रेक्षकांचं मात्र चांगलंच मनोरंजन होतंय.   

nikki tamboli accuses jaan kumar sanu of forcefully kissing her captain aly goni gets angry on him  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nikki tamboli accuses jaan kumar sanu of forcefully kissing her captain aly goni gets angry on him