ED Investigation : 'मी नाही त्यातली अन्...' निक्की तांबोळीची धक्कादायक बाब उघड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukesh Chandrashekhar and Nikki Tamboli case news

Sukesh Chandrashekhar: 'मी नाही त्यातली अन्...' निक्की तांबोळीची धक्कादायक बाब उघड

Sukesh Chandrashekhar Case: बॉलीवूडमधील तारकांच्या बाबत अनेक धक्कादायक खुलासे आता समोर येताना दिसत आहे. काही दिवसांपासून प्रसिद्ध (Bollywood Actress) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझच्या बाबत खळबळजनक बातम्या व्हायरल होताना दिसत आहे. जॅकलीन आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा (Nikki Tamboli) करणारा सुकेश चंद्रशेखर हे एकमेकांना भेटत असल्याची माहिती ईडीला मिळाली. त्यांनी जॅकलीनची चौकशी सुरु केली. त्यानंतर आता आणखी काही अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत.

बिग बॉस फेम निक्की तांबोळी ही देखील जेलमध्ये सुकेश चंद्रशेखरला भेटली होती. आणि तिनं त्याच्याकडून मोठी रक्कम कॅशच्या स्वरुपात घेतल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. दिवसेंदिवस सुकेश चंद्रशेखर मनी लॉड्रिंग प्रकरण वेगळ्या प्रकारे समोर येताना दिसत आहे. त्यात होणारे खुलासे चाहत्यांना काळजीत टाकत आहेत. निक्की तांबोळीच्या सुकेशच्या भेटीनं पुन्हा एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे.

विरल भयानीनं सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली आहे. त्यामध्ये त्यानं ईडीचा दाखला देत निक्की तांबोळीविषयीची धक्कादायक बातमी सांगितली आहे. निक्की तांबोळीनं सुकेशची जेलमध्ये भेट घेऊन त्याच्याकडून तीन लाख रुपयांची कॅश घेतली होती. असे म्हटले आहे. याशिवाय गुची सारख्या महागड्या कंपनीची बॅगही तिनं सुकेशकडून गिफ्ट म्हणून घेतले होते. अशी माहिती समोर आली आहे.

दोनशे कोटींचा घोटाळा हा सध्या बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय आहे. त्यामध्ये नवनवीन अभिनेत्रींची नावं समोर येत आहे. निक्की शिवाय चाहत खन्ना, सोफिया सिंग आणि अरुषा पाटील यांनी सुकेशची जेलमध्ये भेट घेतल्याचे ईडीनं म्हटले आहे. यासर्व अभिनेत्री तिहारमध्ये अटकेत असलेल्या सुकेशच्या भेटीला गेल्या होत्या.

Web Title: Nikki Tamboli Sukesh Chandrashekhar Visit Jail Received 35 Lakh Cash Ed Investigation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..