
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च इव्हेंटमध्ये देश-विदेशातील सर्व बड्या व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या या सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीही बॉलिवूड स्टार्सची जत्रा पाहायला मिळाली. कार्यक्रमातून अनेक खास फोटो समोर आले आहेत.
सध्या एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्याला पाहून चाहत्यांनी कमेंट करायला सुरुवात केली आणि न्यासा देवगणला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. खरं तर, कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी न्यासा देवगणही आई काजोलसोबत तिथे पोहोचली होती. यादरम्यान आई आणि मुलगी दोघींनी पापाराझींसमोर पोज दिल्या.
काही वेळ पोज दिल्यानंतर दोघे निघू लागले तेव्हा न्यासाला सोलो पिक्चरला मागणी आली. यावर काजोलने मुलीला हातवारे करत फोटो काढण्यास सांगितले, पण न्यासाने नकार दिला. न्यासाने काजोलला नकार दिल्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट झाले आहे. सोशल मीडिया यूजर्सना ही गोष्ट आवडली नाही आणि लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, "आजच्या पिढीला पालकांसोबत फोटो काढण्यात इट्रस्ट नसतो." एकाने लिहिले, "तिच्या मुळे नेहमीच तिच्या आईचा अपमान होतो." सूरज कृष्णा नावाच्या युजरने लिहिले की, "आजकालची ही मुलं सर्वांसमोर त्यांच्या पालकांचा अपमान करतात."
नीता मुकेश अंबानी अंबानी कल्चरल सेंटर लॉन्च इव्हेंटमध्ये शाहरुख खान, सलमान खान, सैफ अली खान, रजनीकांत, करीना कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, आलिया भट्ट, रेखा यांसारखे बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार्स पोहोचले होते. आणि हॉलीवूडमधून स्पायडर-मॅन फॅन टॉम हॉलेंड, जेंडाया आणि गिगी हदीद सारखे तारे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.