थँक्यु अक्षय कुमार.. केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांचे ट्वीट चर्चेत..

अक्षय कुमारने 'रोड सेफ्टी' विषयावर केलेले काम पाहुन नितीन गडकरी खुश झाले.
Nitin Gadkari praises Akshay Kumar for promoting road safety campaign
Nitin Gadkari praises Akshay Kumar for promoting road safety campaign sakal
Updated on

nitin gadkari : तीन दशकापेक्षा अधिक काळापासून बॉलीवुड क्षेत्रात अॅक्टिव्ह असणारा अभिनेता अक्षय कुमारने बॉलीवुडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अक्षय आज अमाप संपत्ती कमावली. पण तो कामावलेल्या संपत्तीतून दान धर्म देखील भरपूर करतो. त्याचा सामाजिक कार्यात मोठा वाटा आहे. अनेक संस्थांशी तो जोडला गेला आहे. शिवाय देशावर आलेल्या अनेक संकटांमध्ये त्याने आर्थिक मदतीचा हात पुढे केलेला आहे. नुकतीच त्याने भारत सरकार साठी एक जाहिरात केली. त्यातील अक्षयचे काम पाहुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्षयचे कौतुक केले आहे. (Nitin Gadkari praises Akshay Kumar for promoting road safety campaign)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्षय कुमारचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सीटबेल्ट, एअरबॅग यांची आवश्यकता आणि रस्त्यावर घ्यावयाची काळजी याबाबत संदेश दिला आहे. या मोहिमे अंतर्गत अक्षयने काही जाहिराती केल्या आहेत;. त्याचे काम आपल्याला भावेल असे आहे. त्याच्या या चांगल्या कामाचा लोकांवरही सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या व्हिडिओ शेअर करत अक्षयचे आभार मानले आहे.

ते लिहितात, 'अक्षय कुमार, देशव्यापी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहिमेला पाठिंबा दिल्याबद्दल तुझे आभार. रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यांवर जागरूकता पसरवण्याचे तुझे प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत. आम्ही जागरूकता आणि लोकसहभागाने भारतातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी वचनबद्ध आहोत,' असे ट्वीट नितीन गडकरी यांनी केले. अक्षयच्या या व्हिडिओ सध्या बऱ्याच व्हायरल होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com