बीग बी म्हणतायत, नो बड्डे.. नो दिवाली!

मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

मुंबई : यंदाचं वर्ष बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासाठी खूप स्पेशल आहे. तसंच त्यांच्या चाहत्यांनाही हे वर्षं अविस्मरणीय करायचं आहे, कारण यंदा बिग बी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करत आहेत, या वाढदिवसापाठोपाठ दिवाळी येत असल्याने यंदाची दिवाळी मोठी असणार अशी खात्री बच्चन यांच्या चाहत्यांना होती, पण साक्षात अमिताभ यांनी ट्विटरवरून यंदा बर्थ डे सेलिब्रेशन आणि दिवाळी असं काहीही आपण साजरं करणार नसल्याचं सांगितलं आहे. 

बच्चन यांनी ट्विटरवरून सर्वांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटरवर 30 मिलियन फाॅलोअर्स पूर्ण केल्याबद्दल तर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. तो स्वीकारतानाच यंदा आपण वाढदिवस आणि दिवाळी असं काही साजरं करणार नसल्याचं सांगितलं आहे. यंदा दिवाळीला आपण मुंबईत नसू असंही त्यांनी सूचित केलं आहे. त्याचं कोणतंही ठोस कारण मात्र त्यांनी दिलेलं नाही. ट्विट करताना, यंदा भारताने आॅस्ट्रेलियाला हरवलं, मी 30 मिलियन फाॅलोअर्स पार केले अशा चांगल्या घटनांचा हवाला देत आता वाढदिवस साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे. दिवाळीचा हवाला देतानाच आपल्या ब्लाॅगमध्ये त्यांनी वाढदिवसही साजरा करणार नसल्याचं म्हटलं आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no diwali celebration for amitabh bachchan