esakal | बर्थ डे च्या दिवशीच गौरी खानची निराशा | Gauri khan
sakal

बोलून बातमी शोधा

बर्थ डे च्या दिवशीच गौरी खानची निराशा

बर्थ डे च्या दिवशीच गौरी खानची निराशा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानची (shahrukh khan) पत्नी गौरी खानचा (gauri khan) आज ५१ वा वाढदिवस आहे. खरंतर वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असतो. पण यंदाचा वाढदिवस गौरी खानसाठी दरवर्षी सारखा नाहीय. शाहरुख आणि गौरीचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (drug case) न्यायालयीन कोठडीत आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावर (bail plea) कोर्टात सुनावणी झाली. काल न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आर्यनच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला.

आज न्यायालयात सुनावणी झाली. पण आर्यनला दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आर्यनचा आर्थररोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. मुलाचा तुरुंगावास हा कुठल्याही आई-वडिलांसाठी दु:खद असतो. शाहरुख-गौरीही याला अपवाद नाही. त्यामुळे वयाच्या ५१ व्या वर्षात पर्दापण करणाऱ्या गौरीसाठी यंदाचा वाढदिवस खूपच निराशाजनक ठरला आहे.

हेही वाचा: 'वेलकम बॅक, एअर इंडिया,' रतन टाटांचं खास टि्वट

आज तिचे डोळे मुलाच्या सुनावणीकडे लागले होते. मुलाला जामीन मंजूर होणं हेच तिच्यासाठी मोठं बर्थ डे गिफ्ट ठरलं असतं. पण असं होऊ शकलं नाही. बॉलिवूडमध्ये शाहरुख-गौरीचा मोठा मित्रपरिवार आहे. आज अनेकांनी गौरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आर्यनच्या जामीन अर्जाच्या सुनावणीच्या पार्श्वभुमीवर काहींनी तिला बर्थ डे गिफ्ट मिळेल असेही म्हटले होते. हे बर्थ डे गिफ्ट म्हणजे आर्यनच्या जामिनाला मंजुरी हेच होते. पण असं घडलं नाही.

loading image
go to top