सलमानच्या फॅन्ससाठी महत्त्वाचं! 'भारत'चे तिकीट स्वस्तच असणार!

वृत्तसंस्था
शनिवार, 1 जून 2019

सलमान खानचा कोणत्याही नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड 'क्रेझ' असते. त्याचे बहुतांश चित्रपट सुटीच्या दिवसांनाच प्रदर्शित होतात आणि त्यावेळी तिकिटांचे दरही वाढविले जातात. पण आता सलमानने त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटानिमित्त चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आणली आहे. 'भारत'साठी तिकिटांचे दर न वाढविण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे.

मुंबई : सलमान खानचा कोणत्याही नव्या चित्रपटाची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड 'क्रेझ' असते. त्याचे बहुतांश चित्रपट सुटीच्या दिवसांनाच प्रदर्शित होतात आणि त्यावेळी तिकिटांचे दरही वाढविले जातात. पण आता सलमानने त्याच्या आगामी 'भारत' या चित्रपटानिमित्त चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आणली आहे. 'भारत'साठी तिकिटांचे दर न वाढविण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे. 

सणाच्या दिवशी महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित होत असल्याने त्या कालावधीमध्ये तिकिटांचे दर अंदाजे 30 ते 40 टक्‍क्‍यांनी वाढविले जातात. यापूर्वी 'कलंक', 'ठग्ज ऑफ हिंदुस्तान', 'झिरो' या अलीकडच्या चित्रपटांच्या तिकिटांमध्ये असाच 'ट्रेंड' दिसला होता. पण 'भारत'साठी तिकीट दर वाढविण्याच्या प्रस्तावावर सलमानने नकार दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. 

'भारत' हा चित्रपट येत्या पाच जून रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये सलमानसह दिशा पटानी, कॅतरिना कैफ, नोरा फतेही आणि सुनील ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास झफर यांनी केले आहे, तर संगीत विशाल-शेखर यांनी दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No ticket hike for Salman Khan starrer movie Bharat