Nora Fatehi On Lovelife: प्रेमाविषयी मोठी गोष्ट बोलून गेली नोरा; म्हणाली,'माझ्या आयुष्यात..' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nora Fatehi

Nora Fatehi On Lovelife: प्रेमाविषयी मोठी गोष्ट बोलून गेली नोरा; म्हणाली,'माझ्या आयुष्यात..'

Nora Fatehi On Lovelife:नोरा फतेहीच्या म्युझिक व्हिडीओचा विचार केला तर त्या प्रत्येकात ती बहुतेककरुनं बेइमान गर्लफ्रेंडच्याच रुपात दिसली आहे. प्रेक्षकांमध्ये तिची इमेज बिघडत चाललीय असं आता नोराला वाटत आहे आणि ती त्यामुळे चिंतेत पडली आहे.

नुकत्याच रिलीज झालेल्या 'अच्छा सिला दिया..' गाण्यात नोरा एक अशी पत्नी बनली आहे,जी आपल्या पार्टनरचाच मर्डर करते.(Nora Faehi on her lovelife, partner, relationship)

हेही वाचा: Madhuri च्या ड्युप्लिकेटचा सोशल मीडियावर धुमाकूळ..धकधक गर्लचे पती श्रीराम नेनेही होतील कन्फ्यूज..

जेव्हा नोराला एका मुलाखतीत, तिनं प्रत्यक्ष आयुष्यात कोणाला धोका दिलाय का असं विचारलं गेलं तेव्हा उत्तर देताना ती म्हणाली,'' प्रत्यक्ष आयुष्यात मी बेईमानी मुलगी नाहीच मुळी. आता ही खूप अजब गोष्ट आहे की,मी जेवढे अल्बम केले आहेत,त्यात मी धोका देणारी मुलगी दाखवलीय..जी नेहमीच मुलाला एकटं सोडून जाते.''

'' आणि राहिला प्रश्न माझ्या आयुष्याचा,तर माझ्या आयुष्यात अनेकांनी मला धोका दिला आहे. पण देवाच्या कृपेने मला कोणी इतकं बर्बाद केलं नाही जसं त्या गाण्यात दाखवलं आहे''.

रोमॅंटिक गाण्यात दिसणारी नोरा सध्या सिंगल आहे, आपल्या पार्टनरमध्ये नोराला कोणते गुण हवे आहेत असा प्रश्न तिला केल्यावर नोरा म्हणाली, ''माझा जोडीदार ईमानदार असावा आणि मेहनती असावा आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्यावर मनापासून प्रेम करणारा असावा''.

हेही वाचा: Rakhi Sawant नंतर आता शर्लिन चोप्रानं टार्गेट केलं सलमान खानला, खिल्ली उडवत म्हणाली...

म्युझिक अल्बमची क्वीन म्हणून आपल्याला ओळखतं जातं याचा आनंदच आहे पण ही सिंगल गाणी शूट करताना माझ्या इतकंच याच्यासाठी काम करणाऱ्या टीम मधील अनेकांची मेहनत यात आहे हे सांगायला नोरा विसरली नाही.

''मी खूश आहे की लोकांना माझी गाणी पसंत येतात. मला अल्बम करायला आवडतात कारण यात अभिनयासोबत डान्सही करण्याची संधी मिळते. मला एक कलाकार म्हणून हे खून चॅलेंजिंग वाटतं''

काही दिवसांपूर्वीच नोराचं 'अच्छा सिला दिया' हे गाणं रिलीज झालं. या गाण्यात नोरा सोबत राजकुमार राव दिसला. राजकुमार रावचं हे म्युझिक अल्बम इंडस्ट्रीत पदार्पण आहे. या गाण्याला बी प्राकनं गायलं आहे आणि गाण्याचे शब्द जानीनं लिहिलं आहेत.