Money Laundring Case प्रकरणात आता दोन अभिनेत्री एकमेकींच्या विरोधात, नोराचा जॅकलिनवर मानहानीचा दावा..Nora Fatehi files defamation suit against actress Jacqueline Fernandez | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nora Fatehi files defamation suit against actress Jacqueline Fernandez

Money Laundring Case प्रकरणात आता दोन अभिनेत्री एकमेकींच्या विरोधात, नोराचा जॅकलिनवर मानहानीचा दावा..

Money Laundring Case : कॉनमॅन सुकेश चंद्रशेखरच्या 200 करोडच्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात सहआरोपी असलेल्या जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत. आता नोराने जॅकलिन फर्नांडिसच्या विरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात मानहानीची केस दाखल केली आहे. नोराने काही वृत्तवाहिन्यांवर देखील मानहानीची केस दाखल केली आहे.(Nora Fatehi files defamation suit against actress Jacqueline Fernandez)

हेही वाचा: Vidya Balan Video: भर पार्टीत कॅमेऱ्यासमोरच विद्याच्या साडीच्या निऱ्या सुटल्या,पदरानेही दिला दगा...

सुकेश चंद्रशेखरशी जोडल्या गेलेल्या मनी लॉन्ड्रिंग केस प्रकरणात ईडीनं नोरा फतेहीची देखील कसून चौकशी केली आहे. आता या केसप्रकरणात दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत. नोरानं मानहानीच्या केसमध्ये दावा केला आहे की सुकेश चंद्रशेखरच्या केसमध्ये जाणुनबुजून तिचं नाव ओढलं गेलं. तिचं म्हणणं आहे की,सुकेशशी कधीच तिचा थेट संबंध नव्हता,तर त्याची पत्नी लीनाच्या माध्यमातून ती त्याला ओळखत होती. तसंच,सुकेशनं दिलेल्या कोणत्याही गिफ्टला तिनं स्विकारलेलं नाही.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

हेही वाचा: Ram charan: अय्यो अण्णा गुड न्यूज..'RRR' फेम अभिनेता रामचरण होणार बाबा

नोराने कोर्टात दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीत म्हटलं आहे की याप्रकरणात माझं नाव गोवल्यामुळे माझ्या प्रतिष्ठेवर त्याचा परिणाम झाला आहे. तिनं दावा केला आहे की कितीतरी नवे प्रोजेक्ट तिच्या हातातून निघून गेले आहेत. यामुळे जॅकलिनने तिच्याविषयी दिलेल्या चुकीच्या स्टेटमेंटला तसंच मी़डियानं पसरवलेल्या बातम्यांना नोरानं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसानीसाठी जबाबदार ठरवलं आहे. पटियाला हाऊस कोर्टात नोरानं दाखल केलेल्या मानहानीच्या केस प्रकरणात 19 डिसेंबर,2022 ला सुनावणी होणार आहे.