esakal | Zaalima Coca Cola: गणेश आचार्य, नोरा फतेही आणि गोविंदा 'बस्सं माहोल'
sakal

बोलून बातमी शोधा

nora fatehi govinda and ganesh acharya

Zaalima Coca Cola: गणेश आचार्य, नोरा फतेही आणि गोविंदा 'बस्सं माहोल'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - पंकज त्रिपाठी (pankaj tripathi) आणि क्रिती सेनन (kriti sanon) यांची प्रमुख भूमिका असलेला मिमी चित्रपट आज सायंकाळी ऑनलाईन लिक झाला आहे. त्यामुळे निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. याकरिता त्यांनी एक तातडीनं निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात मिमिचा ट्रेलर आणि त्यातील एक गाणे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. चार दिवस अगोदरच हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आल्यानं प्रेक्षकांनाही नवल वाटले आहे. (mimi released jio studios and netflix starring kriti sanon and pankaj tripathi yst88)

30 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र तो आजच प्रदर्शित झाला आहे. काही वेबसाईटवर त्याची कॉपी लिक झाली आहे. त्यामुळे अखेर निर्मात्यांना हा चित्रपट प्रदर्शित करावा लागला आहे. 9 जुलैला या चित्रपटाचा पोस्टर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर पंकज त्रिपाठी आणि क्रिती सेनननं लाइव्हव्दारे प्रेक्षकांशी संवादही साधला होता. यात गंमतीची गोष्ट अशी की, यापूर्वी बाप आणि मुलीची भूमिका केलेल्या पंकज त्रिपाठी आणि क्रिती सेनन यांनी या चित्रपटामध्ये पती पत्नीची भूमिका केली आहे.

यासगळ्या प्रकाराविषयी पंकज त्रिपाठीनं सांगितलं की, मिमी आमच्यासाठी खूपच महत्वाची फिल्म आहे. त्यासाठी आम्ही असा विचार केला की आजच हा चित्रपट पाहून घ्यावा. मग पुन्हा आमच्या लक्षात आले की, तुम्हीच आमचा सर्वात मोठा परिवार आहात. तेव्हा आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की, आपण आमचा हा चित्रपट जरुर पाहावा. आपल्या सहकार्याशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही. आता डबल सेलिब्रेशनचा जमाना आहे.

हेही वाचा: शर्लिन चोप्राला क्राईम ब्रँचकडून समन्स, चौकशीसाठी बोलवणार

हेही वाचा: 'देवा तो तुरूंगातच राहु दे' राजला असं म्हणणारी पुनित कौर आहे कोण ?

या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी आणि क्रिती सेनन यांच्याशिवाय मनोज पाहवा, सुप्रिया पाठक यांच्या सारखे कलाकारही आहेत. मराठी दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. एका तरुण मुलीची कथा या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. एक अमेरिकन कुटूंबासाठी ती सरोगेसी मदर होते. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.

loading image
go to top