
सुकेश, पिंकीला कधीच भेटली नाही; सुकेशशी व्हॉट्सॲपवर बोलायची - नोरा फतेही
Nora Fatehi Latest News मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) तब्बल पाच तास चौकशी करण्यात आली. बुधवारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली होती. गुरुवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता नोरा फतेही दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर झाली. पाच तासांच्या चौकशीनंतर ती EOW कार्यालयातून बाहेर पडली. ‘सुकेश किंवा पिंकीला कधीच भेटली नाही. सुकेशशी व्हॉट्सॲपवर बोलायची’ असे नोराचे म्हणणे आहे.
बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुकेश चंद्रशेखरशी संबंध असलेल्या खंडणी प्रकरणात चौकशी केली. या प्रकरणात कथित भूमिकेसाठी तिला दिल्ली पोलिसांनी आधीही चौकशीसाठी बोलावले होते. नोराची पिंकी इराणी समवेत चौकशी करण्यात आली.
पिंकीने नोराची ओळख सुकेश चंद्रशेखर याच्याशी करून दिली होती. बुधवारी या प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची चौकशी करण्यात आली होती. यावेळी पिंकी इराणी आणि जॅकलीन यांच्याच भांडण झाले होते. तसेच त्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची माहिती आहे.