Money Laundering Case : जॅकलीन फर्नांडिस, पिंकी इराणीत भांडण; केली शिवीगाळ

पिंकी इराणीने सुकेश आणि जॅकलीनची भेट घडवून आणली होती
Sukesh Chandrasekhar Case News
Sukesh Chandrasekhar Case NewsSukesh Chandrasekhar Case News

Sukesh Chandrasekhar Case News दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सुकेश चंद्रशेखरच्या (Sukesh Chandrasekhar) २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी सुरू केली आहे. नोरा फतेहीची पिंकी इराणीला समोर बसवून चौकशी होण्याच शक्यता आहे. बुधवारी जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) साडेआठ तास चौकशी केली होती. जॅकलीन, पिंकी इराणीची समोरासमोर चौकशी करण्यात आली. यावेळी जॅकलीन आणि पिंकी यांच्यात जोरदार भांडण झाले. दोघींनी एकमेकांना शिवीगाळ केली, अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंकी इराणीने सुकेश आणि जॅकलीनची भेट घडवून आणली होती. ‘सुकेश चंद्रशेखर २०० कोटींच्या फसवणुकीच्या प्रकरणात दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असल्याची माहिती जॅकलीनला (Jacqueline Fernandez) होती. यानंतरही जॅकलीनने त्याच्याकडून भेटवस्तू घेतल्या’ अशी पिंकी म्हणाली. मात्र, जॅकलीनने पिंकी खोट बोलत आहे. तिला याची कल्पना नव्हती, असे म्हटले.

Sukesh Chandrasekhar Case News
Daler Mehndi : गायक दलेर मेहंदीला जामीन; पटियाला कोर्टाच्या निर्णयाला स्थगिती

‘सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलीन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला या भेटवस्तू दिल्या होत्या’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. चंद्रशेखरने फर्नांडिसला भेटवस्तू देण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला, असा आरोपही ईडीने केला आहे.

‘सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) हा गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून दिल्ली पोलिसांद्वारा अटक होईपर्यंत जॅकलीन फर्नांडिसशी नियमित संपर्कात होता’ असे एजन्सीने तपासात आढळल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि पिंकी इराणी यांच्यासह आठ जणांना अटक केली आहे. दिल्ली न्यायालयात दोन आरोपपत्रेही दाखल केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com