Video : नोरा फतेहीचा 'फायर डान्स' होतोय व्हरायरल!

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

या डान्ससाठी तिने प्रशिक्षण घेतले आहे. केवळ 2 दिवसात ती हा नृत्यप्रकार शिकली. आगीसोबत नाचणे सोपे नव्हते. या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावरचे भयभीत हावभावही दिसत आहेत. पण मला एक नवीन नृत्य प्रकार शिकायला मिळाला, असे तिने सांगितले. 

अभिनेत्री नोरा फतेहीचं 'बाटला हाऊस' या चित्रपटातलं 'साकी साखी' हे गाणं खूप गाजलं. पण या गाण्यात तिने जो 'फायर डान्स' केला आहे, त्यासाठी तिला प्रचंड कष्ट घ्यावे लागले. गेले काही दिवस तिच्या या डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

या डान्ससाठी तिने प्रशिक्षण घेतले आहे. केवळ 2 दिवसात ती हा नृत्यप्रकार शिकली. आगीसोबत नाचणे सोपे नव्हते. या व्हिडिओत तिच्या चेहऱ्यावरचे भयभीत हावभावही दिसत आहेत. पण मला एक नवीन नृत्य प्रकार शिकायला मिळाला, असे तिने सांगितले. 

तिच्या या प्रयत्नांमुळे या गाण्याने युट्युबवर 10 करोडचा टप्पा पार केलाय. पहिल्यांदाच बॉलिवूडमधील गाण्याने इतक्या मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळविले आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nora Fatehis s fire dance gets viral