आई कुठे काय करते: समीर धर्माधिकारी नव्हे तर 'या' अभिनेत्याची एण्ट्री | Aai Kuthe Kay Karte | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aai kuthe kay karte arundhati actress madhurani gokhale prabhulkar

'आई कुठे काय करते' मालिकेत समीर धर्माधिकारी नव्हे तर 'या' अभिनेत्याची एण्ट्री

स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'च्या Aai Kuthe Kay Karte कथानकात अत्यंत रंजक वळण येणार आहे. या मालिकेत एका नव्या कलाकाराची एण्ट्री होणार असून समीर धर्माधिकारी त्या भूमिकेत दिसणार अशी जोरदार चर्चा होती. या नव्या व्यक्तीच्या येण्याने अरुंधतीच्या आयुष्यात बरेच काही बदल घडणार आहेत. या व्यक्तीची भूमिका समीर धर्माधिकारी साकारणार नसून अभिनेता ओमकार गोवर्धन Omkar Gowardhan साकारणार असल्याचं समजतंय.

अरुंधतीच्या आयुष्यात तिच्या मित्राची एण्ट्री होणार आहे. आशुतोष केळकर असं या व्यक्तिरेखेचं नाव असून ओमकार ती साकारणार आहे. आशुतोष आणि अरुंधती हे एकाच कॉलेजमध्ये होते. त्यामुळे कॉलेजचा मित्र पुन्हा आयुष्यात आल्यानंतर मालिकेत काय नवीन रंजक वळण येणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ओमकारने 'सावित्री जोती' या मालिकेत भूमिका साकारली होती. त्याने इतरही काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

हेही वाचा: 'हे बघ भावा, तुझा पोरगा दोषी..'; मराठी अभिनेत्याची शाहरुखसाठी पोस्ट

'आई कुठे काय करते' या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर ही अरुंधतीची भूमिका साकारत आहे. तर मिलिंद गवळी अनिरुद्धच्या भूमिकेत आहेत. मालिकेत संजनाची नकारात्मक छटा असलेली भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारत आहे.