esakal | अब्रुनुकसानीचा दावा ठोकताच पायल नरमली ; आता रिचाची माफी मागावी लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

Now Payal Ghosh Ready To Apologise Richa Chadha

पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटीआणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला होता. रिचाने पायलसोबत अभिनेता कमाल आर. यालाही प्रतिवादी करण्यात आले आहे.  यावर संतापलेल्या रिचाने तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा दावा ठोकला होता.

अब्रुनुकसानीचा दावा ठोकताच पायल नरमली ; आता रिचाची माफी मागावी लागणार

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष विरोधात अभिनेत्री रिचा चड्ढाने अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. यासगळ्यात पायलने एका व्हिडीओत अनुरागवर आरोप करताना रिचाचे देखील नाव घेतले होते.

पायलने आपल्याबाबतीत केलेली वक्तव्ये खोटीआणि बदनामी करणारी असल्याचा आरोप रिचाने याचिकेद्वारे केला होता. रिचाने पायलसोबत अभिनेता कमाल आर. यालाही प्रतिवादी करण्यात आले आहे.  यावर संतापलेल्या रिचाने तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा दावा ठोकला होता. परंतु या प्रकरणातून पायलने आता माघार घेतली आहे. रिचाची बिनशर्त माफी मागायला ती तयार आहे.अब्रुनुकसानीच्या दाव्याबरोबरच पायल आणि इतरांना खोटी वक्तव्ये करण्यापासून रोखण्याचा अंतरिम दिलासा देण्याची मागणीही केली आहे. 

ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शिकर यांचं निधन

पायल घोष हिने सोशल मीडियावर जो एक व्हिडीओ शेअर केला त्यात अनुराग कश्यप याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला. तिची आणि अनुराग याची मैत्री फेसबुकवर झाल्याचं तिनं सांगितलं. त्यानंतर ती अनुराग याला भेटली. तिसऱ्या भेटीत अनुरागने तिला घरी बोलावलं आणि यावेळी त्यांनी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे तिनं म्हटलं होतं. यानंतर तिनं केलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी अनुराग विरोधात बलात्कार, गैरवर्तन आणि चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी कलम ३७६, ३५४, ३४१ आणि ३४२ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला.

इंडियन एक्सप्रेसच्या एका  वृत्तानुसार कोर्टात सुनावणीदरम्यान पायलने माघार घेतली. ती म्हणाली, “मी रिचाची बिनशर्त माफी मागायला तयार आहे. कुठल्याही हेतूपरस्पर तिचं नाव मी घेतलं नव्हतं. माझ्याकडून चूक झाली. मी तिची खूप मोठी फॅन आहे. मी बोलताना थोडं भान ठेवायला हवं होतं. मी माझं विधान मागे घेत आहे. कुठल्याही महिलेला बदनाम करणं हा माझा उद्देश नव्हता.”