NTR 30: 'एनटीआर 30'मध्ये ज्युनियर NTR दिसणार दुहेरी भूमिकेत! सैफ अली खानही या चित्रपटाचा असणार भाग

'RRR'च्या यशानंतर आता ज्युनियर एनटीआर या चित्रपटाद्वारे चाहत्यांची मने जिंकण्यासाठी येत आहे.
saif ali khan and ntr
saif ali khan and ntr Sakal

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या तिसाव्या चित्रपटाची म्हणजेच एनटीआर 30 ची चाहत्यांमध्ये आधीपासूनच क्रेझ पाहायला मिळत आहे. चाहते चित्रपटाशी संबंधित अपडेट्सची सतत वाट पाहत असतात. आता बातमी आहे की, बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान देखील या प्रोजेक्टचा एक भाग असणार आहे. मात्र, याला चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

'RRR'च्या घवघवीत यशानंतर आता ज्युनियर एनटीआर या चित्रपटाद्वारे चाहत्यांची मने जिंकण्यासाठी येत आहे. हा एक अखिल भारतीय चित्रपट असेल म्हणजेच तो संपूर्ण देशात तमिळ, तेलगू आणि इतर दक्षिण भाषांमध्ये तसेच हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचवेळी आता सैफ अली खानही यात सामील होण्याची शक्यता आहे.

saif ali khan and ntr
Alia-Ranbir: आलिया भट्टने पापाराझींसमोर रणबीरला केले किस, व्हिडिओ व्हायरल

या चित्रपटासाठी सैफ अली खानला आधीच साईन केल्याचे वृत्त आहे. चित्रपटाच्या तिसऱ्या शेड्यूलमध्ये तो सेटवर जॉईन होण्याची शक्यता आहे. असे झाले तर चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असेल. मात्र, या बातमीनंतर सैफचे चाहते सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत.

saif ali khan and ntr
Mandira Bedi Birthday: एकेकाळी मंदिरा राहायची भाड्याच्या घरात, आज आहे करोडोंची मालकीण; जाणून घ्या संपत्तीबद्दल

चाहत्यांसाठी एक मोठे अपडेट म्हणजे त्यांना या चित्रपटात ज्युनियर एनटीआर दुहेरी भूमिकेत पाहायला मिळू शकेल. या चित्रपटात हा अभिनेता बाप आणि मुलाच्या दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा एका मच्छीमार समाजाच्या जीवनावर आधारित असेल. चित्रपटाचे दिग्दर्शन कोराताला शिवा करत आहेत. ब्लॉकबस्टर 'जनता गॅरेज' नंतर एनटीआर आणि शिवाचा हा दुसरा चित्रपट आहे. NTR 30 5 एप्रिल 2024 रोजी रिलीज होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com