
Israel Palestine war nushratt bharuccha broke silence : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा गेल्या दोन ते तीन दिवसांपासून चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. सध्या इस्त्राईल हा देश युद्धाच्या छायेत आहे. दोन दिवसांपूर्वी हमास नावाच्या दहशतवादी संघटनेनं त्या देशावर हल्ला केला होता.
हमासनं इस्त्राईलवर केलेल्या हल्ल्यात शेकडो नागरिकांचे प्राण गेले आहेत. या हल्ल्याला इस्त्राईलनं देखील जशास तसे उत्तर दिले आहे. इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी देखील अशा प्रकारचा भ्याड हल्ला सहन केला जाणार नाही. आणि ज्यांनी कुणी हे धाडस केले आहे त्यांना योग्य ती शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितले होते.
Also Read - लहान मुलांनी अस्थिर, चंचल असणं हे ADHD चे लक्षण आहे का?
प्रसिद्ध अभिनेत्री बॉम्ब हल्ल्याच्या वेळी इस्त्राईलमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गेली होती. तिला काही वेळ तिथं अडकून राहावे लागले. दरम्यानच्या काळात नुसरतप्रती काळजी व्यक्त करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. तिच्या कुटूंबियांनी देखील ती आता भारतात परतणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काही तासांतच नुसरतचं मुंबईत आगमन झालं होतं.
सध्या सोशल मीडियावर नुसरतनं एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्या व्हिडिओतून त्यावेळी इस्त्राईलमध्ये काय परिस्थिती होती हे नुसरतनं सांगितले आहे. तिच्या त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत.
इस्त्राईलवर हल्ला झाला आहे असे जेव्हा मला कळले तेव्हा धक्काच बसला. काय करावे सुचेना. सगळीकडून बॉम्ब वर्षावाला सुरुवात झाली होती. गोंधळाची परिस्थिती होती. अनेकांनी संधी मिळेल तशी पळायला सुरुवात केली होती. काही ठिकाणी मोठमोठे आवाज होत होते. आम्ही खूपच घाबरुन गेलो होतो. आमच्यातील काहीजण हॉटेलमध्येच होते.
आम्हाला सुरक्षेच्या कारणास्तव बेसमेंटमध्ये नेण्यात आले होते. अशा सगळ्या वातावरणाचा मला कधीही अनुभव नव्हता. हे सारं माझ्यासाठी नवीन होतं. त्यामुळे मी खूपच भांबावून गेले होते. परिस्थितीच तशी होती. अशा शब्दांत नुसरतनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.