esakal | बाळाच्या वडिलांबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाल्या नुसरत जहां
sakal

बोलून बातमी शोधा

TMC MP Nusrat Jahan s Health Improves Released from Hospital

बाळाच्या वडिलांबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाल्या नुसरत जहां

sakal_logo
By
स्वाती वेमूल

तृणमूल काँग्रेसच्या खासदार TMC MP आणि अभिनेत्री नुसरत जहां यांनी प्रसुतीनंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आल्या. २६ ऑगस्ट रोजी नुसरत यांनी मुलाला जन्म दिला. त्यानंतर त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. यावेळी नुसरत पहिल्यांदाच माध्यमांसमोर मुलाच्या पित्याबद्दल व्यक्त झाल्या. ८ सप्टेंबर रोजी कामाला सुरुवात केल्यानंतर त्या माध्यमांसमोर आल्या. बाळाचा चेहरा आम्हाला पहायला मिळेल का, असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर नुसरत म्हणाल्या, "तुम्ही हा प्रश्न बाळाच्या वडिलांना विचारला पाहिजे. कारण ते या क्षणी कोणालाच त्याला पाहू देत नाहीयेत."

२५ ऑगस्ट रोजी नुसरत यांना कोलकातामधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी बंगाली अभिनेता यश दासगुप्ता Yash Dasgupta त्यांच्यासोबत होता. गेल्या काही महिन्यांपासून नुसरत यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत आहे. 19 जून 2019 मध्ये नुसरत यांचे लग्न निखिल जैनसोबत Nikhil Jain झाले. निखिल आणि नुसरत यांनी तुर्कीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. नुसरत यांनी लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअरदेखील केले होते. तुर्कस्थानमधील कायद्यानुसार नुसरत आणि निखिलचे लग्न झाले. भारतीय कायद्यानुसर हे लग्न वैध नाही. यासर्व गोष्टींमुळे नुसरत आणि निखिल यांच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली. नुसरत आणि बंगाली अभिनेता यश दासगुप्ता हे रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. काही महिन्यांपूर्वी नुसरत आणि यश सुट्ट्यांसाठी राजस्थानला गेले होते.

हेही वाचा: 'तारक मेहता..'मधील बबिता-टप्पू एकमेकांना करतायत डेट

कोण आहे यश दासगुप्ता?

नुसरत आणि अभिनेता यश दासगुप्ता यांच्या रिलेशनशिपची चर्चा आहे. यशने 17 फेब्रुवारी 2021 मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने बंगालच्या निवडणुकीमध्ये चंडीतला या मतदार संघातून निवडणूक लढवली. त्यामध्ये त्याला अपयश मिळाले. यश हा अभिनेता, मॉडेल आणि राजकारणी आहे. यशने 'गँगस्टर' या बंगाली चित्रपटामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. 'ना आना इस देस मेरी लाडो' या मालिकेमधील अभिनयाने यशला विशेष लोकप्रियता मिळाली.

loading image
go to top