
पंचायत 2: 'मंजू देवी-प्रधानजी' 40 वर्षांपूर्वीचा फोटो व्हायरल झाला अन्...
लॉकडाऊन दरम्यान अॅमेझॉन प्राइमवर आलेल्या 'पंचायत २'(Panchayat 2) च्या पहिल्या सीरिजनं लोकांचं खूप मनोरंजन केलं होतं. यामुळेच चाहते जितेंद्र कुमार,नीना गुप्ता(Neena Gupta) आणि रघुबीर यादव(Raghubir Yadav) यांच्या पंचायत सीरिजच्या दुसऱ्या भागाची वाट गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होते. अॅमेझॉन प्राइमवर 'पंचायत २' वेब सीरिज रिलीज झालेली आहे. याचे आठ एपिसोड्स आहेत आणि ही सीरिज एका शांत वाहणाऱ्या नदीत जसा पोहण्याचा आनंद मिळतो ना अगदी तसाच आनंद चाहत्यांना देत आहे. या सीरिजच्या कथेच्या प्रवाहाचा आनंद अनुभवताना उगाचच प्रेक्षकांना मधनंच डुबक्या माराव्या लागत नाहीत. जर एका ओळीत 'पंचायत २' विषयी बोलायचं झालं तर ही वेबसीरिज मनोरंजनाचा पूरेपूर आनंद चाहत्यांना देत आहे.
जसं खूप मेहनतीनं या कथेला एका सुंदर साच्यात बांधलं गेलंय तसंच यातील कलाकारांनी देखील आपल्या अभिनयानं 'पंचायत २' ला सजवलं आहे. जर यातील व्यक्तिरेखांविषयी बोलायचं झालं तर या 'पंचायत २' वेबसीरिज मधील नीना गुप्ता(मंजू देवी) आणि रघुबीर यादव(प्रधान जी) यांच्या फोटोचा एक कोलाज सध्या वायरल होत आहे. ज्यामधील एक फोटो या दोघांच्या तरुणपणातील आहे. आणि दुसरा फोटो सध्याच्या 'पंचायत २' वेबसीरिज मधील आहे.
हेही वाचा: Abhay Deol: दिग्दर्शकानं पसरवली होती घाणेरडी अफवा; अभिनेत्याचा मोठा खुलासा
या फोटोला ट्वीटरवर एका नेटकऱ्यानं शेअर केलं आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं आहे की,'''१९८२-२०२२' हा फोटो शेअर केल्याबरोबरच तब्बल ४५ हजार नेटकऱ्यांनी त्याला लाइक केलं आहे. हा फोटो पाहून काही नेटकऱ्यांना वाटलं की प्रत्यक्ष आयुष्यातही नीना गुप्ता-रघुवीर यादव कपल आहेत. काहींनी तर थेट,'' याला म्हणतात नातं निभावणं'' अशा पद्धतीच्या प्रतिक्रियाच नोंदवल्या आहेत. हा फोटो पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्यांना खरोखरचे नवरा-बायको म्हणून समजलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी या फोटोला बॅकग्राऊंड म्युझिक देत आणखी रंग त्यात भरले आहेत. काही प्रतिक्रिया वाचल्यावर तर खो-खो हसू आल्या शिवाय राहणार नाही.
Web Title: Old Picture Of Manju Devi And Pradhan Ji Of Panchayat 2 Went Viral People Made Funny Comments After Seeing The
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..