Abhay Deol: दिग्दर्शकानं पसरवली होती घाणेरडी अफवा; अभिनेत्याचा मोठा खुलासा Bollywood Actor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhay Deol

Abhay Deol: दिग्दर्शकानं पसरवली होती घाणेरडी अफवा; अभिनेत्याचा मोठा खुलासा

'रांझणा','आयशा','जिंदगी ना मिलेगी दोबारा' असे वेगळ्या धाटणीचे सिनेमे केलेल्या अभय देओलच्या(Ahay Deol) अभिनयाचं नेहमीच कौतूक करण्यात आलं आहे. पण असं असलं तरी अभय देओलला हवीतशी प्रसिद्धि आणि यश मिळालं असं मात्र म्हणता येणार नाही. तसं पाहिलं तर अभय देओल हा बॉलीवूडच्या(Bollywood) फिल्मी कुटुंबातून आलेला. स्टार किड असून अन् त्या उपर त्याच्या अंगात अभिनय कौशल्य असूनही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे हे ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही. पण आता स्वतः अभय देओलनं बॉलीवूडविषयी मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा: 'तारक मेहता' मधून आता हॉट 'बबिता' घेणार एक्झिट? कारणही आलं चर्चेत

अभय देओलचं म्हणणं आहे की,''बॉलीवूडमध्ये तुम्हाला केवळ अभिनय चांगला करता आला म्हणजे झालं असं मुळीच नाही, तुम्हाला स्वतःचंही इथे चांगल्या प्रकारे मार्केटिंग करता आलं पाहिजे''. हे सांगतानात अभय देओलनं एका बॉलीवूडच्या बड्या दिग्दर्शकानं आपल्या विरोधात खोटी अफवा पसरवली होती असा मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा: 'अजुनही ही दुधखुळीच?'; केतकीची बाजू घेणाऱ्या पोंक्षेंना टिळेकरांचा सवाल...

अभय देओलने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की,''आज १७ वर्षानंतरही मला वाटतं की मी बॉलीवूडमध्ये फीट बसत नाही. मी जास्त मेहनत करु शकलो असतो खरं तर बॉलीवूडमध्ये स्वतःला फीट बसवण्यासाठी. मी आधी नेहमी विचार करायचो की, ही किती विचित्र पद्धत आहे,लोकांना आपल्याविषयी स्वतःच सांगा. पण आता समजतंय की स्वतःला चर्चेत ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही गप्प बसलात की लोकांना वाटतं तु्म्ही कुठल्याच कामाच्या योग्यतेचे नाही. बस्स,इथेच मी मागे पडलो. मी लोकांना कधीच माझ्याविषयी ओरडून ओरडून काही सांगितलं नाही''.

हेही वाचा: 'अकेलेपन का मजा अलग है..', शमा सिंकदरनं ओलांडल्या मर्यादा,हॉट फोटोची चर्चा

अभय देओल पुढे म्हणाला,''मी बॉलीवूडमध्ये इथल्या गटबाजीमुळे फिट होऊ शकलो नाही. मला वाटतं की यासंदर्भात सगळ्याच लोकांना माहित आहे. इंडस्ट्रीत खूप गट आहेत. आणि यापैकी कोणत्या ना कोणत्या ग्रुपचा भाग तुम्ही बनू शकता. जर विचार केला तर ही गटबाजी मला जातीवाचक वाटते. म्हणजे तुम्ही तुमच्या जातीचा ग्रुप शोधा आणि त्याचा भाग बना,म्हणजे ते तुम्हाला पाठिंबा देतील. इथे प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट पद्धत आहे. ती त्याच प्रकारे होते आणि यात फायदा-नुकसान दोन्ही असतं. मी कुठून आलोय,मी कोण आहे हे मला ठाऊक होतं म्हणून मला मुद्दामहून काहीजणांनी मागे खेचायचा प्रयत्न केला. एक वेळ अशी आली होती की जेव्हा मला स्वतःविषयी,स्वतःच्या कर्तृत्वावर शंका यायला लागली होती. त्यावेळी स्वतःचा खूप राग यायचा''.

हेही वाचा: IPL फायनल मॅचमध्ये असं कधीच घडलं नव्हतं, मात्र आमिर खान घडवून आणणार, वाचा..

अभय देओलनं बॉलीवूडच्या एका दिग्दर्शकाविषयी देखील मोठा खुलासा केला आहे. अभय देओल म्हणाला,''एक वेळ होती जेव्हा एका बड्या दिग्दर्शकानं सर्वांसमोर माझ्याविषयी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या होत्या,आणि खोटी अफवा पसरवली होती. मला खूप चांगलं लक्षात आहे त्या दिग्दर्शकाविषयी आणि त्यानं पसरवलेल्या त्या खोट्या अफवेसंदर्भात. या सगळ्याच गोष्टींचा सामना करायची तयारी बॉलीवूडमध्ये काम करताना असायला हवी''.

Web Title: Abhay Deol Says Bollywood Is Very Cliquish It Doesnt Matter If Youre From A Film

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top