'स्क्विड गेम'मधल्या म्हाताऱ्यानं जिंकलं 'गोल्डन गोल्ब'

जगभरामध्ये ज्या प्रचंड लोकप्रिय अशा वेब सीरिज (Netflix) आहेत त्यापैकी एक म्हणजे स्क्विड गेम (Squid Game Web serise) ही होय.
Squid Game Web serise
Squid Game Web serise

जगभरामध्ये ज्या प्रचंड लोकप्रिय अशा वेब सीरिज (Netflix) आहेत त्यापैकी एक म्हणजे स्क्विड गेम (Squid Game Web serise) ही होय. ही मालिका प्रदर्शित होताच त्याच्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या होत्या. अनेकांनी या मालिकेला नावं ठेवली. मात्र आजही आयएमडीबीच्या यादीत या मालिकेला मोठ्या प्रमाणात रेटिंग मिळालं आहे. मानवी क्रुरता, गरीबी, स्वार्थ, आशावाद, भूक यासारख्या वेगवेगळ्या मानवी मुल्यांवर अतिशय प्रभावीपणे भाष्य मालिकेनं केलं होतं. त्या मालिकेतील काही पात्रं ही प्रेक्षकांची फेव्हरिट झाली होती. त्यातील तो म्हातारा तर प्रेक्षकांचा खास होता.

आता त्या म्हाताऱ्याला गोल्डन ग्लोब (Golden Globe) नावाचा पुरस्कार जाहिर झाला आहे. म्हातारा अशा अर्थानं की अनेकांनी त्यांचं नामकरण म्हातारा असंच केलं. त्या प्रसिद्ध अभिनेत्याच नाव ओ युंग सू असं असून ते 77 वर्षांचे आहेत. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. जगभरातून त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव झाला आहे. स्क्विड गेम ही नेटफ्लिक्सनं (Squid game netflix 2021) प्रदर्शित केलेली मालिका होती. आता या मालिकेचा एकच सीझन प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

यंदाच्या वर्षी नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक यशस्वी मालिका म्हणून स्क्विड गेम्सला पसंती मिळाली आहे. त्यामध्ये वृद्धाची भूमिका करणाऱ्या ओ युंग सू यांच्यावर कौतूकाचा वर्षाव करण्यात आला आहे. यापूर्वी ओ युंग (O Yeong-su) यांना कधीही गोल्डन गोल्बनं गौरविण्यात आलेलं नाही. असा त्यांचा सन्मान पहिल्यांदाच होतो आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या नावाचे काही मीम्सही व्हायरल झाले आहेत. त्या मालिकेमध्ये मुख्य सुत्रधार असणाऱ्या म्हाताऱ्यानं आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतले होते.

Squid Game Web serise
83 Movie Review: अविस्मरणीय विजयाची यशोगाथा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com