Om Puri: एकेकाळी चहाची भांडी धुणाऱ्या ओम पुरी यांनी बॉलीवुडच नाही तर हॉलीवुडही गाजवलं..

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांची याज जयंती, त्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या काही खास गोष्टी..
Om Puri Birth Anniversary he worked at tea stall to bollywood and hollywood movies struggle lifestyle
Om Puri Birth Anniversary he worked at tea stall to bollywood and hollywood movies struggle lifestyle sakal
Updated on

Om Puri : अभिनेते ओम पुरी यांचं नाव आजही प्रचंड अदबीने आणि मानाने उच्चारलं जातं. ओम पुरी यांचा अभिनय आणि त्यांनी केलेलं काम पुढच्या कित्येक पिढ्यांना आदर्श देणारं आहे. ओम पुरी यांनी 2017 मध्ये जगाचा निरोप घेतला. आज त्यांची जयंती आहे. या निमित्ताने त्यांच्या आठवणी जागावल्या जात आहे. ओम पुरी हे दिग्गज अभिनेते असले तरी हा प्रवास इतका सहज नव्हता. ओम पुरी यांनी अत्यंत हालाखीचे दिवस सोसून हे यश मिळवलं होतं. त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांचा अविस्मरणीय आणि प्रेरणादायी प्रवास..

(om puri birth anniversary) (Om Puri Birth Anniversary he worked at tea stall to bollywood and hollywood movies struggle lifestyle )

ओम पुरी यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1950 रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण पटियाला येथून झाले. बालपणी त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाखीची होती. घराला आर्थिक हातभार लावण्यासाठी ते लहानपणीच काम करून कुटुंबाचे पोट भरत होते. याबाबत अनेकदा ते स्वतःच सांगायचे. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी कुटुंबाचं पोट भरण्यासाठी चहाचे ग्लास धुतले होते. त्यांनी मिळवलेले यश हे प्रचंड संघर्ष करून मिळवले होते.

Om Puri Birth Anniversary he worked at tea stall to bollywood and hollywood movies struggle lifestyle
Kedar Shinde: एक गोष्ट ध्यानात ठेव! केदार शिंदेंची लेक सनासाठी खास पोस्ट

ओम पुरींचे इंग्रजी फारसे चांगले नव्हते. त्याची हिंदीही फारशी बरी नव्हती. याचे कारण म्हणजे, त्यांचे शिक्षण पंजाबी भाषेत झाले होते. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये प्रवेश घेतला तरी, ते मनासारखे वावरत नव्हते. त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे, एका क्षणी त्यांनी अभिनय न करण्याचा निर्णय घेतला होता. पण नसीरुद्दीन शाह यांनी त्यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन दिले. त्यांच्या हलाखीच्या काळात नसीरुद्दीन शाह त्यांच्या सोबत होते. अगदी ओम पुरी हॉलीवुड पर्यंत पोहोचले यामागेही नसीरुद्दीन शाह यांचे मोठे योगदान आहे.

नाटकानंतर ओम पुरी यांनी आपल्या अभिनय करकीर्दीला मराठी चित्रपटातून सुरुवात केली. 1976 मध्ये आलेल्या ‘घाशीराम कोतवाल’ या मराठी चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा अभिनय केला. परंतु 1983मध्ये आलेल्या ‘अर्ध सत्य’ या चित्रपटातून त्यांना खरी ओळख मिळाली. 1988 मध्ये, ओम पुरी यांनी दूरदर्शनच्या प्रसिद्ध टीव्ही मालिका 'भारत एक खोज' मध्ये अनेक भूमिका साकारल्या,ज्यामुळे ते लोकप्रिय झाले.

ओम पुरी यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक पुरस्कार मिळवले. एवढेच नाही तर राष्ट्रीय पुरस्कारावर देखील त्यांचे नाव कोरले गेले. 'मिर्च मसाला', 'जाने भी दो यारो', 'आंटी 420', 'हेरा फेरी', 'मालामाल विकली' यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. ‘अर्धसत्य’ चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. त्यांच्या कामावर हॉलीवुडकरांनीही प्रचंड प्रेम केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com