'ओमेर्टा'चा ट्रेलर लाँन्च

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 मार्च 2018

मुंबई - हंसल मेहता दिग्दर्शित 'ओमेर्टा' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश दहशतवादी अहमद ओमर सईद शेखच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट आहे. यामध्ये राजकुमार या दहशतवाद्याची मुख्य भूमिका साकारत आहे.

ही एक रिअल लाईफ स्टोरी असून, प्रेक्षकांना हंसल मेहता आणि राजकुमार राव यांची केमेट्री पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. या जोडीने रिअल लाईफ स्टोरी असलेले 'शाहिद', 'अलिगढ', 'सिटीलाइट्स' हे चित्रपट एकत्र केले होते. आता ओमेर्टाबद्दलही चांगलिच उत्सुकता आहे.  

'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स'चे शिक्षण घेणारा अहमद ओमर सईद शेख दहशतवादी कसा होतो असा या चित्रपटाचा आशय आहे. लंडन आणि भारतात ओमेर्टाचे शूटिंग पार पडले असून, काही दहशतवादी हल्ल्यांचा चित्रपटाच्या कथेत समावेश करण्यात आला आहे. 1994मधील दिल्ली अपहरण प्रकरण असो, 9/11चा वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला आणि 26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला या घटनाही चित्रपटात दाखवण्यात येणार आहेत.

अहमद ओमर सईद शेख

  •  ब्रिटिश नागरिकत्व
  •  लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला अहमद उमर सईद शेख याने कोलकात्यात पाच पोलिसांना ठार केले.
  •  त्याला पकडण्यात आले होते, परंतु, 'आयसी-814'च्या अपहरणानंतर प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात ज्या तिघा दहशतवाद्यांना सोडून देण्यात आले, त्यात तो होता.
  •   'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वर दोन, पेन्टॅगॉनवर एक आणि पेन्सिल्व्हानियात एक असे चार प्रवासी विमाने आदळवणार्‍यांचे नेतृत्व त्याने केले होते.
  •  'वर्ल्ड ट्रेड सेंटर'वर सर्वप्रथम विमान आदळवणारा इजिप्शियन महमद अट्टा याला 'इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स'चे तेव्हाचे प्रमुख जनरल मेहमूद अहमद यांच्याकडून 1 लाख अमेरिकन डॉलर्स त्याने पोचवले होते.
  •  तो गणिती म्हणूनच ओळखला जायचा
  •  शेख सईदने नंतरच्या काळात अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जनरल या वृत्तपत्राचा आशिया विभाग प्रमुख डॅनियल पर्ल याचा निर्घृण खून केला. 
  •  या प्रकरणात त्याला फाशीची शिक्षा होऊनसुद्धा आज तो युरोपातल्या अनेक दहशतवाद्यांशी मोबाइलवरून संपर्क ठेवून असल्याची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Omertà Official Trailer Rajkummar Rao Hansal Mehta