झारखंडमधल्या 50 मुलींना सोनु सुद देणार नोकरी

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 6 October 2020

सोनूने आपल्या ट्विट मधून याविषयी अधिक माहिती दिली आहे. त्यात त्याने धनबादमधील ५० मुलींना नोकरी मिळवून देण्याचं वचन दिलं आहे. धनबादमधील माझ्या ५० बहिणींना मी एका आठवड्यात नोकरी मिळवून देईन.” असे त्याने म्हटले आहे.

मुंबई - आतापर्य़त देशातील विविध ठिकाणी गरजूंना मदतीचा हात पुढे करण्यात सोनु सुदचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. शिक्षण, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात सोनुने महत्वाची भूमिका घेतली आहे. आपल्या सामाजिक दातृत्वामुळे परिचित असणा-या सोनुकडून आता झारखंडमधील मुलींसाठी पुढाकार घेतला आहे. या राज्यातील एका जिल्हयात असणा-या ५० मुलींच्या नोकरीची जबाबदारी त्याने घेतली आहे.

कोरोनाचा भयानक परिणामाचा मोठा फटका शैक्षणिक क्षेत्राला बसला आहे. अद्याप दिवसेंदिवस वाढत जाणा-या कोरोनामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र मुलांचे नुकसान होऊ नये यासाठी अनेक शैक्षणिक संस्थांनी ऑनलाईन वर्ग घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे अनेक लोकांचे जीवन कोलमडून पडले आहे.  लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी  अभिनेता सोनू सूद याने गरीबांसाठी मदतीचा हात दिला आहे. त्याने झारखंडमधील ५० तरुणींना नोकरी मिळवून देण्याचं वचन दिलं आहे.

पायल घोषविरोधात रिचा चड्ढा झाली आक्रमक : अब्रुनुकसानीचा ठोकला दावा

याबाबत अधिक माहिती त्याने आपल्या ट्विट मधून दिली आहे. त्यात त्याने धनबादमधील ५० मुलींना नोकरी मिळवून देण्याचं वचन दिलं आहे. धनबादमधील माझ्या ५० बहिणींना मी एका आठवड्यात नोकरी मिळवून देईन.” असे सूदने म्हटले आहे. “आम्ही झारखंडमधील धनबाद जिल्ह्यात राहतो. लॉकडाउनमुळे आमच्या गावातील ५० तरुणींच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या मुली सध्या बेरोजगार आहेत. कृपया नोकरी मिळवून देण्यासाठी आपण मदत करावी.” या आशयाचे  ट्विट करुन या तरुणींनी सोनूकडे मदत मागितली होती. 

कपिल शो सगळ्यात ''बकवास'' कार्यक्रम ; मुकेश खन्ना यांच्य़ा ट्वीट्सवरुन ''महाभारत''

यापुर्वीही सोनू सूदने चंदीगढ राज्यातील मोरनी येथील दपना गावात विद्यार्थ्यांसाठी मोबाईल टॉवर उभारुन दिला आहे. ऑनलाईन अभ्यासात येणारी मोबाईल नेटवर्कची अडचण सोडवण्यासाठी  एक मोबाईलचा टॉवरच बसवून दिल्याने त्याला मोठ्या संख्येने फॅन्सने धन्यवाद दिले आहेत.  या गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासात सतत नेटवर्कची अडचण येत असल्याने या दोघांनी गावात थेट मोबाईल टॉवरच उभारण्याचा निर्णय त्याने घेतला. त्यानुसार नेटवर्कमध्ये खंड पडू नये यासाठी त्यांनी इंडस टॉवर्स आणि एअरटेलच्या मदतीने गावात मोबाईल टॉवर उभारला आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Once Again Actor Sonu Sood take initiative to Helps 50 Unemployed Girls