कपिल शो सगळ्यात ''बकवास'' कार्यक्रम ; मुकेश खन्ना यांच्य़ा ट्वीट्सवरुन ''महाभारत''

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 6 October 2020

कपिलच्या त्या कार्यक्रमामध्ये नीतीश भारद्वाज (श्रीकृष्ण), गजेंद्र चौहान (युधिष्ठिर), फिरोज़ खान (अर्जुन), पुनीत इस्सर (दुर्योधन), गूफी पटेल (शकुनि) सहभागी झाले होते. सोनी टीव्हीवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणारा  ‘द कपिल शर्मा’ त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिध्द आहे. हसत खेळत इतरांची फिरकी घेत मनोरंजन करणारा हा कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांच्या खास आवडीचा विषय आहे.

मुंबई - सोनी वाहिनीवर सुरु असणा-या महाभारत या मालिकेतील सर्व कलाकार कपिल शर्माच्या प्रसिध्द अशा ‘द कपिल शर्मा' शो मध्ये गेले. अपवाद होता तो ‘भीष्म पितामह’ मुकेश खन्ना यांचा. या कार्यक्रमाला इतर सर्व कलाकार आले असताना आपण गैरहजर का होता, असा प्रश्न सोशल माध्यमांतून त्यांना विचारला गेला. यावर त्यांनी आपल्या ट्वीट्समधून जे उत्तर दिले त्यामुळे नव्या‘ महाभारताला' सुरुवात होणात असल्याची चर्चा रंगली आहे. 

कपिलच्या त्या कार्यक्रमामध्ये नीतीश भारद्वाज (श्रीकृष्ण), गजेंद्र चौहान (युधिष्ठिर), फिरोज़ खान (अर्जुन), पुनीत इस्सर ( दुर्योधन), गूफी पटेल (शकुनि) सहभागी झाले होते. सोनी टीव्हीवर गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असणारा  ‘द कपिल शर्मा’ त्याच्या वेगळेपणासाठी प्रसिध्द आहे. हसत खेळत इतरांची फिरकी घेत मनोरंजन करणारा हा कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांच्या खास आवडीचा विषय आहे.

रविवारी झालेल्या एका खास शो मध्ये महाभारत या मालिकेचे ५ कलाकार या मालिकेत सहभागी झाले होते. या मालिकेत ‘ भीष्म पितामह’ ची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यावेळी अनुपस्थित होते. याचे कारण काय, हे त्यांना प्रेक्षकांनी विचारल्यानंतर कपिल शो वर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे महाभारत या मालिकेतील इतर कलावंतांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे.

अभिनेत्रीने मॉडर्न फॅमिलीच्या एका एपिसोडसाठी घेतले इतके कोटी; सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांमध्ये अव्वल

अखेर मुकेश खन्ना यांनी त्या शो मध्ये न जाण्याचे कारण सांगितले. ते म्हणाले, ‘ भीष्म पितामह’ यांच्याशिवाय महाभारत अपूर्ण आहे. मला त्या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते असे म्हणणे चूक आहे. वास्तविक मीच त्या कार्यक्रमाला जायला नकार दिला होता. मला हे मान्य आहे की, कपिल शो हा भलताच लोकप्रिय आहे मात्र मला हा कार्यक्रम बकवास वाटतो. त्याच्या इतका वाईट शो दुसरा नाही. अश्लील विनोदांनी भरलेला असा हा कार्यक्रम आहे ज्यात पुरुष स्त्रियांचे कपडे घालून नको ते अंगविक्षेप करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. आणि विशेष म्हणजे यावर प्रेक्षक पोट धरुन हसत सुटतात.

 

एवढीच टीका करुन मुकेश खन्ना थांबले नाहीत. त्यांनी कपिल शो मध्ये जजच्या भूमिकेत असलेल्या अर्चना पूरन सिंह यांच्याबद्दल परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले, या शो मध्ये अशाप्रकारच्या गोष्टी का होतात हे मला समजत नाही. एखादा व्यक्ती त्या परिक्षकाच्या खुर्चीत बसणार आणि त्याचे महत्वाचे काम म्हणजे फक्त हसत राहणे. तुम्हाला हसायला आले नाही तरीही हसत राहण्याचे पैसे या कार्यक्रमातून मिळतात.

गायिका नेहा कक्करच्या लग्नाची पुन्हा चर्चा, पंजाबी गायकासोबत करणार लग्न?

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mukesh Khanna slams Kapil Sharma Show, calls it ‘vulgar