Onkar Bhojane: माझ्यामुळे त्यांना.. अखेर ओंकार भोजनेनं सांगितलं 'हास्यजत्रा' सोडण्याचं कारण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onkar Bhojane reveals why he left maharashtrachi hasyajatra comedy show on sony marathi

Onkar Bhojane: माझ्यामुळे त्यांना.. अखेर ओंकार भोजनेनं सांगितलं 'हास्यजत्रा' सोडण्याचं कारण..

Onkar Bhojane: आपल्या अभिनयाने आणि दमदार विनोदाने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा एक तरुण अभिनेता म्हणजे ओंकार भोजने. गेली काही वर्षे ओंकारने आपल्याला सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून खळखळून हसवले. पण काही दिवसांपूर्वी त्याने अचानक हास्यजत्रा सोडली आणि ओंकारवर सडकून टीका झाली. त्याने तसे का केले याचे उत्तर कायमच गुलदस्त्यात राहिले, अखेर ओंकारनेच यावर खुलासा केला आहे. (Onkar Bhojane reveals why he left maharashtrachi hasyajatra comedy show on sony marathi)

हेही वाचा: Apurva Nemlekar: अण्णांची शेवंता दिसणार मांजरेकरांच्या चित्रपटात.. अपूर्वानेच सांगितली..

महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून गाजलेला ओंकार भोजने आता लवकरच चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ‘सरला एक कोटी’ असे या चित्रपटाचे नाव असून अत्यंत वेगळ्या धाटणीची अशी त्याची भूमिका आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो बऱ्याच ठिकाणी भेट देत आहे. याच निमित्ताने एका मुलाखतीत बोलताना त्याने हास्यजत्रा सोडण्याचे कारण सांगितले.

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

हेही वाचा: Lal Bahadur Shastri: लाल बहादूर शास्त्रींची हत्या की?.. विवेक अग्नीहोत्रींनी असा घेतला शोध..

ओंकार म्हणाला, ' हास्यजत्रा करत असतानाच मला दोन चित्रपटात काम करण्याची संधी आली होती आणि माझ्यामुळे त्यांना सारखे ऍडजस्ट करावे लागत होते, म्हणून मला ब्रेक हवा होता. तसंच माझी प्रकृती ठीक नव्हती म्हणून मी या कार्यक्रमातून मी कायमचा ब्रेक घेतला.'

याच मुलाखतीत ओंकारने ‘फू बाई फू’ मध्ये जाण्याचेही कारण सांगितले. तो म्हणाला, 'मी 'फू बाई फू' केलं कारण मला एक फोक प्रकार करायचा होता. ती संधी मला त्या कार्यक्रमात मिळाली म्हणून मी तिथे गेलो. विशेष म्हणजे या सगळ्यातून मी शिकत गेलो माझं सध्या चांगलं चाललं आहे.' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.