Selfiee Release: अक्षयचा सेल्फी बघायला फक्त दोनच माणसं, थिएटरवाल्यांनी रागाच्या भरात.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar, selfiee, emran hashmi

Selfiee Release: अक्षयचा सेल्फी बघायला फक्त दोनच माणसं, थिएटरवाल्यांनी रागाच्या भरात..

Selfiee Release News: अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा सेल्फी आज थिएटरमध्ये रिलीज झालाय. सेल्फीच्या माध्यमातून इम्रान हाश्मी अनेक दिवसांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. सेल्फीचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाला.

असं वाटत होतं कि.. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट होईल पण चित्र मात्र उलटं दिसतंय. सेल्फी पाहायला थिएटर ओस पडले आहेत.

(Only two people to see Akshay kumar, emran hashmi selfiee movie, Theater owners canceled the show)

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक रिकामं थिएटर दिसतंय. फक्त दोन माणसं सेल्फी पाहायला थिएटरमध्ये आले होते. "दोन लोकांसाठी शो नाही लावू शकत. अजून कोण आलं नाही सिनेमा पाहायला.."

असं सांगून थिएटर कर्मचाऱ्यांनी अक्षय कुमारच्या सेल्फीचा शो थेट रद्द केला. "पहिल्यांदा आयुष्यात अशी घटना घडली.. कि सिनेमा पाहायला गेलो आणि सिनेमा न पाहताच परत आलो.. "अशा शब्दांमध्ये प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केलीय.

सेल्फी सिनेमाचे मोशन पोस्टर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांना या सर्वांना सिनेमाच्या ट्रेलरची प्रतिक्षा होती. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वांना सिनेमाचा ट्रेलर प्रचंड आवडला.

अखेर आज २४ फेब्रुवारीला अक्षय कुमार आणि इम्रान हाश्मी यांची प्रमुख भूमिका असलेला 'सेल्फी' सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज झालाय.

या चित्रपटात अक्षय कुमार विजय नावाच्या सुपरस्टार अभिनेत्याची भूमिका साकारत आहे तर इमरान पोलिस ऑफिसर आहे.

सेल्फी सिनेमाचं कथानक खूप इंटरेस्टिंग आहे. अभिनेता विजयला (अक्षय कुमार) ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असते तर आरटीओ ऑफिसरला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा असते.

'सुपरस्टार विजयला परवाना हवा असेल तर त्याला इथे येऊन सर्वसामान्यांप्रमाणे सर्व टेस्ट द्याव्या लागतील.' असं आरटीओ ऑफिसर(इमरान) म्हणतो. त्यामुळे विजयचा इगो दुखावतो. मग पुढे काय होते ते हे सिनेमात पाहणे उचित.

अक्की आणि इमरान यांचा हा सिनेमा फुल ऑन मसाला सिनेमा असून त्यात कॉमेडी, थ्रिलर आणि अॅक्शन एकत्र दिसणार आहेत. पृथ्वीराज प्रॉडक्शन, धर्मा प्रोडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स निर्मिती 'सेल्फी' आज 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

सिनेमात अक्की आणि इम्रान व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत. सेल्फी हिट होणार असेल वाटत असतानाच थिएटरमधली परिस्थती मात्र तितकी चांगली नाही