Cillian Murphy : 'ओपनहायमर' होण्यासाठी काय केलं? भगवद्गगीता वाचली, बदाम खाल्ले अन्...

ओपनहायमरची भूमिका करणाऱ्या सिलियन मर्फीची मुलाखत आता व्हायरल झाली आहे.
Oppenheimer Cillian Murphy how achived role
Oppenheimer Cillian Murphy how achived roleesakal

Oppenheimer Cillian Murphy how achived role : ख्रिस्तोफर नोलनच्या ओपनहायमरविषयी साऱ्या जगभरात चर्चा आहे. भारतातूनही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नोलन त्याच्या या महत्वकांक्षी चित्रपटावर काम करत होता. भारतात ओपनहायमरवरुन वाद होताना दिसतो आहे. त्याचे कारण भगवद्गगीता आहे.

ओपनहायमरची भूमिका करणाऱ्या सिलियन मर्फीची मुलाखत आता व्हायरल झाली आहे. त्यात त्यानं आपल्याला जेव्हा ही भूमिका साकारायची आहे असे कळल्यावर कोणती आव्हानं होती याविषयी सांगितले आहे. सिलियन हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला गेला आहे. त्यासाठी त्यानं घेतलेली मेहनत चाहत्यांसाठी नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. भारतात ओपनहायमला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळालेला दिसून आला आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

मर्फीनं ओपनहायमरमध्ये जी भूमिका साकारली आहे त्याचे कौतूक होताना दिसत आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्यानं गेल्या सहा महिन्यांपासून मेहनत घेतली होती. असे त्यानं त्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. सिलियननं त्याच्या लूक्सवर जास्त कष्ट घेतले आहेत. असं म्हटलं जात होतं की, त्यानं ओपनहायमरची तयारी करताना भगवद्गगीता वाचली होती. आणि कडक डाईटही फॉलो केला होता.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओनं आता मर्फीच्या लाखो चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे. त्यात त्यानं आपण कशाप्रकारे ओपनहायमर यांच्या भूमिकेची तयारी केले हे सांगितले आहे. तो म्हणतो, माझी भूमिका अशी होती त्यात मला खूप रिसर्च करावा लागला. ओपनहायमर यांना जग अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखते. मात्र ते शास्त्रज्ञ, एक व्यक्ती, वडील, म्हणून कसे होते याचीही मला माहिती हवी होती. त्यामुळे मला त्यांच्याविषयी खूप वाचावे लागले.

Oppenheimer Cillian Murphy how achived role
Shah Rukh Khan : 'चक दे इंडिया'! किंग खानच्या हातात ट्रॉफी, यावर्षी भारत वर्ल्ड कप जिंकणारच!

ओपनहायमर साकारताना मला खूपवेळा भगवद्गगीता वाचावी लागली. कारण त्यात ओपनहायमर यांच्या व्यक्तिमत्वाविषयीचे खूप सारे संदर्भ होते. ओपनहायमर यांच्याविषयीचे खूप सारे जूने व्हिडिओ आहेत. ते मी पाहिले. त्यांच्यावरची पुस्तकंही वाचली. माझ्याकडे सहा महिन्यांचा वेळ होता. जो मी पूर्णपणे अभ्यासात घालवला. आता त्याचे समाधान वाटते.

Oppenheimer Cillian Murphy how achived role
Kili Paul video Viral : किली पॉलचा 'गदर', सनीच्या गाण्यावर थिरकला! धर्मेंद्र यांनी केलं कौतूक, तू तर..

सहा महिने मी फक्त बदामच खात होतो. कारण मला झपाट्यानं वजन कमी करायचे होते. त्यामुळे मी आहारावर खूपच लक्ष केंद्रित केले होते. असेही मर्फीनं त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले. ओपनहायमरनं पहिल्या आठवड्यात भारतातून ४९ कोटींची कमाई केली आहे. मात्र त्याला जोरदार टक्कर टॉम क्रुझच्या मिशन इम्पॉसिबलकडून मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com