ऑस्करमध्ये RRR च्या वाट्याला अपमान! दिग्दर्शक राजामौली यांनाच... चाहत्यांचा संताप! | Oscar 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscar 2023

Oscar 2023 : ऑस्करमध्ये RRR च्या वाट्याला अपमान! दिग्दर्शक राजामौली यांनाच... चाहत्यांचा संताप!

Oscar 2023 RRR Movie Director SS Rajamouli viral video : ऑस्करमध्ये भारतीय चित्रपट विश्वासाठी अभिमानास्पद गोष्ट घडली. ती म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला बेस्ट ओरिजनल साँगचा ऑस्कर मिळाला आहे. त्यानंतर सोशल मीडियातून राजमौली आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर कौतूकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

यासगळ्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आरआरआऱ या चित्रपटाचे दिग्दर्शक राजामौली यांच्याबाबतच ही गोष्ट घडल्यानं चाहत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी ऑस्करमध्ये निवेदन करणाऱ्या जीम किमेलकडून आरआऱआऱ चित्रपटाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीनं झाल्यानं वेगळ्याच वादाला सुरुवात झाल्याचे दिसून आले होते. किमलनं RRR चा उल्लेख हा बॉलीवूडचा चित्रपट असा केला होता. त्यामुळे वाद झाला होता.

Also Read - देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

दुसरीकडे ऑस्करचा सोहळा पार पडत होता तेव्हा चाहत्यांनी त्या सोहळ्यामध्ये जी गोष्ट नोटीस केली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राजामौली यांचा अपमान झाल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या थिएटरमध्ये ऑस्करचा पुरस्कार सोहळा पार पडला त्या डॉल्बी थिएटरमध्ये RRR टीम सगळ्यात शेवटी बसली होती. हे चित्र पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

भारतानं यंदाच्या ऑस्कर सोहळ्यामध्ये आपल्या चित्रपटांची मोहोर उमटवली असताना दुसरीकडे सीट्स वरुन वादाला सुरुवात झाली आहे. ऑस्कर सोहळ्यात प्रोटोकॉल नुसार विद्यमान पाहुण्यांना बसण्यासाठी जागा आरक्षित करण्यात येते. त्यात RRR च्या टीमला बऱ्याच अंतरावर असलेल्या सीट्सवर बसविण्यात आले होते. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

एकीकडे RRR वर कौतूकाचा वर्षाव होत असताना दुसऱ्या एका कारणामुळे त्या सोहळ्याला गालबोट लागले आहे. ऑस्कर सोहळा सुरु असताना कॅमेऱ्यामध्ये तो प्रसंग कैद झाला आहे. RRRचे नाव घोषित झाल्यानंतर राजामौलींनी आनंद व्यक्त केला. ज्यावेळी त्यांच्या दिशेनं कॅमेरा फिरला तेव्हा ते सगळ्यात शेवटी बसल्याचे दिसून आले. चाहत्यांना ही गोष्ट खटकली आहे.