esakal | द ऑस्कर गोज टू, द फादर Vs मिनारीमध्ये टफ

बोलून बातमी शोधा

oscars 2021 full nominations

द ऑस्कर गोज टू... द फादर Vs मिनारीमध्ये टफ

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - जगभरात सिनेमा क्षेत्रातील सर्वाधिक मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यंदाचा ऑस्कर सोहळा आता लवकरच पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून जाणकार चित्रपट रसिक आणि प्रेक्षक यांची उत्सुकता ताणली गेली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी पहाटे ऑस्करची घोषणा होणार आहे. यंदा सर्वाधिक चुरस सर्वोत्कृष्ठ अभिनेता आणि सर्वोत्कृष्ठ चित्रपटासाठी आहे. अनेकांनी याबाबत अंदाज वर्तवला आहे. त्यात काय होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. कोरोनाचा परिणाम यावर्षीच्या 93 व्या अकादमी अॅवॉर्डसवर झाला आहे. त्यामुळे यंदाचा महोत्सव सर्वांसाठी स्पेशल असणार आहे.

भारतीय प्रेक्षकांना या पुरस्कार सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोमवारी सकाळी साडेपाच वाजता Oscars.com आणि Oscars.org यावर पाहता येणार आहे.  याशिवाय सध्या जेवढे डिजिटल प्लॅटफॉर्म आहेत त्यापैकी फेसबूक, ट्विटर आणि युट्युबवरही हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे. डिझ्नी हॉट स्टारवरही त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी कुठल्या कॅटगिरीत कुठल्या चित्रपटांना स्थान देण्यात आले आहे हे आपण पाहुया.

सर्वोत्कृष्ठ चित्रपट - द फादर, जुडास एंड द ब्लॅक मसिहा, मंक, मिनारी, नोमॅडलँड, प्रॉमिसिंग यंग वुमेन, साऊंड ऑफ मेटल आणि द ट्रायल ऑफ द शिकागो 7 या चित्रपटांमध्ये सर्वाधिक चुरस आहे. सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक - थॉमस विंटरबर्ग (अनादर राऊंड), डेव्हिड फिंचर (मंक), ली आयसेक चुंग (मिनारी), चुलु जौ (नोमॅडलँड), इमरेल फेनल (प्रोमिसिंग यंग वुमेन)

img

oscar

सर्वोत्कृष्ठ अभिनेता - रिज अहमद (साऊंड ऑफ मेटल), चॅडविक बोस्मन (मा रेने ब्लॅक बॉटम), एंथनी हॉपकिन्स (द फादर), गॅरी ओल्डमॅन (मंक), स्टेवन युन ( मिनार) सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री - विओला डेव्हिस (मा रेने ब्लॅक बॉटम), आंड्रा डे (द युनायडेट स्टेट्स व्हर्सेज बिली हॉलिडे) वेनेसा किर्बी (पीसेस ऑफ अ वुमेन), फ्रान्सेस मेकार्डोमेड (नोमॅडलँड), कॅरी मुलीगन (प्रॉमिसिंग यंग वुमेन)

img

oscar nominations

बेस्ट सिनेमेटोग्राफी - जुडास एंड द ब्लॅक मसीहा, मँक, न्यूज ऑफ द वर्ल्ड, नोमॅडलँड, द ट्रायल ऑफ द शिकागो 7, सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेता - सचा बारोन कोहेन ( द ट्रायल ऑफ द शिकागो 7), डॅनियल कलुया, ( जुडास एंड द ब्लॅक मसीहा), लेसनी ओडोम जुनियर( वन नाइट इन मियामी) पॉल रॅकी (साउंड ऑफ मेटल), लाकेथ स्टेनफिल्ड ( जुडास एंड द ब्लॅक मसीहा)