ऑस्कर सोहळ्यातील 'थप्पड' प्रकरणानंतर विल स्मिथच्या पत्नीनं सोडलं मौन

Will Smith Jada Pinkett
Will Smith Jada Pinkettesakal
Summary

ऑस्करच्या कार्यक्रमात हॉलिवूड अभिनेता विल स्मिथनं कॉमेडियन ख्रिस रॉकला सर्वांसमोर थप्पड लगावलीय.

ऑस्कर विजेता, हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ (Will Smith) यानं ‘ऑस्कर 2022’ च्या (Oscars 2022) कार्यक्रमात कॉमेडियन ख्रिस रॉकला (Chris Rock) सर्वांसमोर थप्पड लगावली, ज्याची आता सर्वत्र चर्चा होत आहे. खरं तर, ख्रिस रॉकनं विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेटची (Jada Pinkett) तिच्या आजारावरून खिल्ली उडवली, जी विल स्मिथला आवडली नाही आणि त्यानं स्टेजवर चढून ख्रिस रॉकला कानाखाली वाजवली. त्यानंतर लगेचच विल स्मिथनं ख्रिसची माफी देखील मागितली. परंतु, या सर्व प्रकरणावर विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेटनं बोलणं टाळलं होतं. मात्र, आता जाडानं देखील आपली प्रतिक्रिया दिलीय.

कोणत्याही प्रकारची हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकॅडमी पुरस्कार सोहळ्यातील (Oscar Awards Ceremony) माझं वर्तन अस्वीकार्य आणि अक्षम्य होतं. माझ्या खर्चावर विनोद करणं हा कामाचा एक भाग आहे असं मी समजू शकतो, परंतु जाडाच्या मेडिकल कंडिशनबद्दल विनोद केलेलं मला सहन झालं नाही आणि भावनेच्या अधीन झाल्यानं मी तसा वागलो. मला जाहीरपणे तुझी माफी मागायची आहे क्रिस. माझी वागणूक मर्यादेपलीकडची होती आणि मी चुकलोय. या प्रेमळ जगात हिंसेला स्थान नाही. मी अकॅडमी, शोचे निर्माते, सर्व उपस्थित पाहुणे आणि जगभरातील प्रेक्षकांची माफी मागतो. मी विलियम्स आणि माझ्या किंग रिचर्डच्या कुटुंबीयांची माफी मागतो. माझ्या या वागण्यामुळं त्या सुंदर प्रवासावर एक डाग पडला. मी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतोय, अशा शब्दांत इंस्टाग्राम पोस्टव्दारे विल स्मिथनं कॉमेडियन ख्रिस रॉकची माफी मागितलीय.

Will Smith Jada Pinkett
'काश्मीर फाइल्स'ला मागे टाकत RRR ची जगभरात 600 कोटींची कमाई

आता या घटनेच्या दोन दिवसांनी जाडानं देखील इंस्टाग्राम पोस्ट करून या प्रकरणावर मौन सोडलंय. जाडानं पोस्टमध्ये लिहिलंय, 'हा उपचारांचा हंगाम आहे आणि त्यासाठी मी इथं आलोय.' तिनं तिच्या कॅप्शनमध्ये हृदय आणि हात जोडलेल्या इमोजींचाही समावेश केलाय. जाडाच्या या सखोल अर्थपूर्ण पोस्टमध्ये तिनं कोणाचंही नाव घेतलेलं दिसत नाहीय. मात्र, तिच्या या अर्थपूर्ण पोस्टची जोरदार चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com