Dhammam Controversy: 'धम्मम' चित्रपटातील वाद नेमका आहे तरी काय? |Pa Ranjith excels with Dhammam new controversy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhammam Controversy news

Dhammam Controversy: 'धम्मम' चित्रपटातील वाद नेमका आहे तरी काय?

Dhammam Movie News: वादात सापडल्याशिवाय त्या कलाकृतीची चर्चाच होत नाही अशी परिस्थिती सध्या काही वर्षांपासून आहे. त्यात सोशल मीडियाच्या प्रभावामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त परिणामकारक प्रतिसाद या कलाकृतींना (Bollywood Movie News) मिळत असल्याचे दिसून आले आहे. एखाद्या चित्रपट, मालिका, त्याविषयी जाणीवपूर्वक वाद निर्माण करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेणे आणि संबंधित चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी तयार करणे हे काही नवीन नाही. मात्र यासगळ्यात काही दर्जेदार कलाकृतींना त्याचा तोटा सहन करावा (Short Flim) लागत आहे. अशा कलाकृतींमध्ये दिग्दर्शकानं मांडलेला विचार व्यापकपणे समोर येण्याऐवजी त्याच्याविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे.

सध्या पा रंजित यांचा धम्मम नावाचा लघुपट हा चर्चेत आला आहे. त्याचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले होते, त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक चित्रपट समीक्षक, लेखक यांनी त्या दिग्दर्शकाचा त्यामागील असलेला विचार काय आहे हे जाणून घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्या पोस्टरवरुन मोठ्या प्रमाणाता वाद सुरु झाला असून त्यातून भगवान बुद्धांपती वेगळा संदेश जात असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

त्याचे काय आहे की, धम्मम चित्रपटात बुद्धाच्या खांद्यावर मुलगी उभी राहून उडण्याची स्वप्न पाहत असल्याचे दिसत आहे. ते दृष्य सध्या सगळीकडे व्हायरल झाले आहे. त्यावरुन संमिश्र प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. एका शाळकरी मुलीचे भावविश्व या लघुपटाच्या माध्यमातून रेखाटण्यात आले आहे. तिचा संघर्ष, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन हे सारं प्रभावीपणे दिग्दर्शक रंजित यांनी मांडले आहे. या लघुपटाला मिळालेला प्रतिसादही मोठा आहे. ती मुलगी त्या पाण्यातील माशाला म्हणते, मी काही तुला इजा करणार नाही. मात्र तुझी जर हरकत नसेल तर दुसऱ्या ठिकाणी तुला घेऊन जाईल.

हेही वाचा: Friendship Day 2022: Friends ला द्या अनोखी भेट, पहा एकापेक्षा एक भारी गिफ्टची लिस्ट

मासा हे या चित्रपटात वेगवेगळ्या अर्थान वापरलं गेलेलं रुपक आहे. असे समीक्षकांनी म्हटले आहे. त्याच्या दृष्टीकोनातून आजचं जग, आजचा समाज आणि त्याच्यापुढे असलेली आव्हानं या साऱ्यावर भाष्य करण्यात आलं आहे. काहींना हा चित्रपट कमालीचा प्रभावित करुन गेला आहे तर काहींनी त्यावर टीका करण्यात समाधान मानल्याचे सोशल मीडियावरील पोस्टवरुन दिसून आले आहे.

हेही वाचा: 'जो स्त्रीचा अपमान करेल...'; संजय राऊतांवरील कंगनाचं वक्तव्य Viral

Web Title: Pa Ranjith Excels With Dhammam New Controversy Start Form School Girl And Buddha Statue

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..