Neetu Kapoor: 'नाटू नाटू' या गाण्यावर थिरकल्या पद्मिनी कोल्हापुरे आणि नीतू कपूर, धमाल डान्स व्हिडीओ व्हायरल

नीतू कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी 'नाटू नाटू' या गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे.
Padmini Kolhapure dances with Neetu Kapoor on Naatu Naatu
Padmini Kolhapure dances with Neetu Kapoor on Naatu Naatu Sakal

नीतू कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे मनोरंजन विश्वात चर्चेत राहतात. दरम्यान, या दोन्ही अभिनेत्री त्यांच्या अलीकडच्या डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत आल्या आहेत. पद्मिनी कोल्हापुरेसह नीतू कपूरने 'नाटू नाटू' या ऑस्कर विजेत्या गाण्यावर डान्स करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. हा डान्स व्हिडिओ पद्मिनी कोल्हापुरेने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

स्वतःचा आणि नीतू कपूरचा डान्स व्हिडिओ शेअर करत पद्मिनी कोल्हापुरेने कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या आवडत्या नीतू कपूरसोबत 'नाटू नाटू' वर स्टेप बाय स्टेप डान्स करताना.'

पद्मिनी कोल्हापुरेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नीतू कपूर 'नाटू नाटू' या ऑस्कर विजेत्या गाण्यावर पद्मिनी कोल्हापुरेचा हात धरून धमाकेदार डान्स करताना दिसत आहे. मात्र, पद्मिनी कोल्हापुरेपेक्षा नीतू कपूर जास्त डान्स मूव्ह करत आहे. यावेळी दोन्ही अभिनेत्रींच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 'नाटू नाटू'वर दोन्ही अभिनेत्रींनी मनमुराद डान्स केला. हा डान्स व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.

Padmini Kolhapure dances with Neetu Kapoor on Naatu Naatu
Chatrapathi: जो सगळ्यांसाठी जगतो तोच खरा 'छत्रपती' ढासू ट्रेलर रिलीज... येताच व्हायरल

'नाटू नाटू' गाण्यावर डान्स करताना नीतू कपूरने काळ्या रंगाचा ब्लेझर आणि पांढऱ्या टॉपसह जांभळ्या रंगाची पॅन्ट घातली आहे. यामध्ये पद्मिनी कोल्हापुरेने निळ्या रंगाचा टॉप आणि काळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. डान्सच्या व्हिडिओमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.

'नाटू नाटू' हे 'RRR' चित्रपटातील गाणे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. हे ऑस्कर विजेते गाणे चंद्रबोसने लिहिले आहे. त्याचे संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com