युट्युब चॅनल चालवतात म्हणजे काहीही बोलायचं?;भुवन बामच्या अटकेची मागणी

महिलांसाठी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे वादात सापडेल्या कॉमेडियन-युट्युबर भुवन बामने सोशल मीडियावर माफीनामा जाहिर केला आहे.
Bhuvan Bam
Bhuvan BamGoogle
Updated on

युट्युबर(youtuber) आणि अभिनेता भुवन बाम(Bhuvan Bam) आपल्या सध्याच्या एका व्हिडीओमुळे चांगलाच अडचणीत फसला आहे. त्यानं सध्या त्यावर माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय खरा. पण बोललं जातंय त्याच्या फॉलोअर्समध्ये कदाचित या व्हिडीओवरील वादाचा परिणाम होऊ शकतो,म्हणजे त्यांच्या संख्येत घट होऊ शकते. चला जाणून घेऊया काय बोलला होता भुवन त्या व्हिडीओत. भुवनने गेल्या आठवड्यात आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. सोशल मीडियावर त्याच्या या व्हिडीओवरनं उलट-सुलट चर्चा रंगली आहे. त्याला अनेकांनी फटकारलं देखील आहे. या व्हिडीओत भुवनने पहाडी महिलांविषयी एक अक्षेपार्ह विधान केल्यानं सारं पुढचं रामायण घडल्याचं बोललं जात आहे.

भुवनच्या या व्हिडीओला खरंतर युट्युबवर १२ मिलियनपेक्षा अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. लेखक आशिश नौटियालने या व्हिडीओतला एक छोटासा भाग शेअर केला आहे. ज्यात भुवननं एक व्यक्तिरेखा साकारली आहे,जी शूटिंगसाठी अॅटोमॅटिक कारची डिमांड करीत आहे. एका कार मॉडेलविषयी चौकशी करण्यासाठी तो डिलरला बोलावतो. पण हा शब्द दोन अर्थानं वापरला आहे. डिलर म्हणजे 'जे महिलांची तस्करी करतात' अशा अर्थानं तो या व्हिडीओत वापरला आहे. या व्हिडीओत भूवननं साकारलेली व्यक्तिरेखा आपल्या मित्राला विचारतेय,'पहाडन है,कितना देती है?' आणि हे तो अगदी काव्यात्मक ओळी वगैरे गाऊन बोलतात तसंच विचारताना तो दिसत आहे. बस्स...त्याच्या याच भाष्यावर राष्ट्रिय महिला आयोगानं ट्वीटरवर पोस्टच्या माध्यमातून चांगलेच ताशेरे ओढले. दिल्ली पोलिसांनी देखील युट्युबर आणि कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध असलेल्या भुवनविरोधात तक्रार दाखल करावी असं निवेदन महिला आयोगान केलं होतं. नेमकं भुवन त्या व्हिडीओत काय आक्षेपार्ह बोललाय हे जाणून घेण्यासाठी बातमीत व्हिडीओची लिंक वर जोडली आहे.

भुवनने मात्र हे प्रकरण तापतंय असं कळल्यावर ट्वीटरवर माफीनामा प्रसिद्ध केला आहे. त्यानं आपल्या ट्वीटला एनसीडब्ल्यूला टॅग करत म्हटलं आहे,''मला माहित आहे माझ्या व्हिडीओतील काही वक्तव्यांनी खूप जणांना ठेच पोहोचली आहे. मी आता त्या व्हिडीओतून तो आक्षेपार्ह भाग हटवला आहे. जे लोक मला ओळखतात त्यांना माहित आहे की मी महिलांचा सम्मान करतो. मला कोणालाही दुखवायचं नव्हतं. मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो ज्यांच्या भावना माझ्या व्हिडीओमुळे दुखावल्या आहेत''. आता पहाडी महिलांवरील त्या आक्षेपार्ह विधानाला भुवन बामनं आपल्या व्हिडीओतून हटवलं आहे. पण तरिही अनेकजण भुवन विरोधात कारवाई व्हावी असा सूर काढताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com