'जिथं कामसुत्राचा जन्म, तिथं पॉर्नला बंदी, याचं आश्चर्य !'

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्राच्या (raj kundra) पॉर्नोग्राफी (pornography) प्रकरणात वेगवेगळे खुलासे बाहेर येत आहेत.
somy ali actress
somy ali actress Team esakal

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्राच्या (raj kundra) पॉर्नोग्राफी (pornography) प्रकरणात वेगवेगळे खुलासे बाहेर येत आहेत. आता पाकिस्तानी अभिनेत्री सोम्या अलीनं (somya ali) एक विधान केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आलं आहे. तिनं केलेलं विधान विचार करण्यास भाग पाडणारं आहे. काहींनी तिला त्या विधानामुळे ट्रोल देखील केलं आहे. सध्या राज हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्यानं जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयानं फेटाळून लावला आहे. दुसरीकडे त्याच्या संदर्भात वेगवेगळे खुलासे समोर येऊ लागले आहेत. (Pak born Somy Ali surprised on porn ban in country where Kamasutra originated yst88)

न्यायालयानं राजला पुन्हा 14 दिवसांची कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांना अद्याप त्याच्याकडून पुरेशी माहिती मिळाली नसल्यानं त्यांनी उपलब्ध वेळेत जास्तीत जास्त पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. आतापर्यत अनेकांनी कुंद्रावर टीका केली आहे. मात्र बॉलीवूडमधील दिग्गज सेलिब्रेटींनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आता त्यावर परदेशातील कलावंत व्यक्त होताना दिसत आहेत.

बॉलीवूडची अभिनेत्री सोम्या अलीनं या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते, ज्या देशात कामसुत्रा सारख्या ग्रंथाचा जन्म झाला तिथं पॉर्नवर बंदी का असा प्रश्न तिनं उपस्थित केला आहे. हिंदूस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सोम्यानं आपली भूमिका व्यक्त केली आहे. मला पॉर्नमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींबद्दल काही बोलायचे नाही. ज्या व्यक्तिंनी त्यामध्ये करिअर करायचं ठरवलं असेल तर तो त्यांचा चॉइस आहे. असे सोम्याला वाटते.

somy ali actress
राज कुंद्राच्या अडचणीत मोठी वाढ; पाहा व्हिडिओ
somy ali actress
'मी काय राज कुंद्रा आहे का?'; राज ठाकरे यांच्या या वक्तव्याची चर्चा तर होणारच!

याबरोबरच जे लोकं पॉर्नोग्राफी पाहतात आपण त्यांच्या विरोधातही नाही किंवा ज्यांचा तो व्यवसाय आहे त्यांचाही व्देष करत नसल्याचे सोम्यानं सांगितलं आहे. देशामध्ये सेक्स एज्युकेशन जास्त महत्वाचे आहे. असे आपल्याला वाटत असल्याचे सोम्या म्हणते. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. त्याला वेगळ्या पद्धतीनं मांडण त्यांच विकृतीकरण करणं हे चूकीचं आहे. त्यामुळे आपण समाजात कसा आणि कोणता संदेश देतो आहोत याचा विचार त्या संबंधित निर्मात्यानं करावा. असं मत सोम्यानं व्यक्त केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com