आमच्याच घरात येऊन आमचीच इज्जत.. Javed Akhtar यांच्या 'त्या' विधानावर पाकिस्तानी सेलिब्रिटी खवळले

जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील कार्यक्रमात जाऊन त्यांना खडे बोल सुनावले
javed akhtar, javed akhtar on pakistan
javed akhtar, javed akhtar on pakistanSAKAL

Javed Akhtar On Pakistan News: ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील कार्यक्रमात जाऊन त्यांना खडे बोल सुनावले. जावेद अख्तर यांनी लाहोर येथे झालेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानच्या नागरिकांना स्पष्ट शब्दांमध्ये जाणीव करून दिली.

जावेद अख्तर यांनी महत्वाचं विधान केलं जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. २००८ ला मुंबईत जो दहशतवादी अटॅक झाला त्यामागचे म्होरके अजूनही पाकिस्तानात खुलेआम फिरत आहेत, असं विधान जावेद अख्तर यांनी केलं.

(pakisatani celebrity slams on javed akhatar for his statement of mumbai attack 26/11)

javed akhtar, javed akhtar on pakistan
Satarcha Salman: शाहरुखचा 'पठाण' झाला, आता मराठी मातीतला 'सातारचा सलमान' येतोय..

या विधानावर पाकिस्तानातील सेलिब्रिटींचं रक्त खवळलं आहे. अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटींनी जावेद अख्तर यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. अभिनेत्री सबूर अलीने लिहिले, "कोणीतरी तुमच्याच मातीवर तुमच्या देशाचा अपमान केला आहे, आणि तुम्ही त्याचा आनंद साजरा करत आहात. , त्याच्या पायाशी बसून अशा आनंदाने त्याचा सन्मान करणे. किती लाजिरवाणे आहे!"

javed akhtar, javed akhtar on pakistan
खूप दिवसांनी समोर आले Mrunal Dusanis चे फोटो, लूक इतका बदललाय कि ओळखू शकणार नाही

अभिनेता शान शाहीदने नुकत्याच कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी केलेल्या टीकेवर त्यांचा खरपूस समाचार घेतला आणि म्हटले की, "जावेद अख्तर गुजरात दंगलीबद्दल मौन बाळगून आहेत, परंतु पाकिस्तानमध्ये बसून 2008 च्या मुंबई हल्ल्याचा आरोप पाकिस्तानवर करत आहेत. जावेदला पाकिस्तानात येण्यासाठी कोणी व्हिसा दिला."

अभिनेता आणि व्हीजे अनुशे अश्रफ यांनी ट्विट केले की, “पाहुण्याला आदर देणे आवश्यक आहे. पण आपल्या स्वाभिमानाच्या किंमतीवर नाही."

अभिनेता हारून शाहिदनेही जावेदच्या पाकिस्तान भेटीबद्दल ट्विट केले. तो म्हणाला, " जावेद साब (सर) येथे एका पार्टीला उपस्थित राहतात आणि ज्यांना वाटतं की त्यांना त्यांच्यासोबत मजा करायची आहे, ते हा कार्यक्रम होस्ट करतात.

पण मला एक समस्या आहे की.. एक राष्ट्र म्हणून आपण कसे आहोत यात आपण अपयशी ठरत आहोत." अशा शब्दात पाकिस्तानी सेलिब्रिटींनी जावेद अख्तर यांना सुनावले आहे.

अशाप्रकारे जावेद अख्तर यांच्या त्या विधानावर पाकिस्तानी सेलिब्रिटी जरी भडकले असले तरीही भारतीयांनी जावेद अख्तर यांच्या स्पष्टवक्तेपणाबद्दल त्यांचं कौतुक केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com