esakal | बारा दिवस क्वॉरनटाईन झाल्यावर अक्रमला पडलं टक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

बारा दिवस क्वॉरनटाईन झाल्यावर अक्रमला पडलं टक्कल

बारा दिवस क्वॉरनटाईन झाल्यावर अक्रमला पडलं टक्कल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आजही जगातील सर्वोत्तम गोलंदाजामध्ये पाकिस्तानच्या त्या खेळाडूचं नाव घेतलं जातं. केवळ गोलंदाज म्हणून नाही तर त्यानं आपल्या नेतृत्वानं पाकिस्तानला अनेक विजयही मिळवून दिले आहेत. सध्या तो वेगवेगळया शो मधून चर्चेत असतो. भारतातही त्याची लोकप्रियता कायम आहे. आपण चर्चा करत आहोत ती पाकिस्तानचा pakistan bowler महान गोलंदाज आणि कर्णधार वसीम अक्रम Wasim Akram याच्याविषयी. सध्या तो चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्यानचं आपला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्याविषयी त्यानं कॅप्शनही लिहिली आहे. आपण बारा दिवस क्वॉरनटाईन असल्याचे त्यानं सांगितलं आहे. चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला भरभरून प्रतिसाद दिला आहे.

वसीम अक्रम Wasim Akram हा जसा त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो तसा तो त्याच्या हटकेपणासाठीही प्रसिद्ध आहे. त्याची हेअर स्टाईल ही नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय राहिली आहे. आयपीएल, वनडे क्रिकेटमध्ये समालोचक म्हणून अजूनही वसीम अक्रम चाहत्यांना भेटतो. भारतावर त्याचं विशेष प्रेम आहे. त्यामुळे भारतातल्या अनेक रियॅलिटी शो मध्ये देखील त्यानं उपस्थिती लावली आहे. प्रसिद्ध कॉमेडी शो असणाऱ्या कपिल शर्माच्या कार्यक्रमातील त्याचा एपिसोड विशेष लोकप्रिय झाला होता. आता वसीम अक्रमचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.त्यात त्यानं आपण बारा दिवस क्वॉरनटाईन असल्याचे सांगितलं आहे.

वसीम अक्रमच्या त्या फोटोला बॉलीवूड अभिनेता गुलशन दवैयानं लाईक केलं आहे. त्यावर वसीमच्या Wasim Akram फॅन्सन मोठ्या संख्येनं कमेंटही दिल्या आहेत. वसीमनं तो फोटो शेयर केल्यानंतर त्याविषयी लिहिलं आहे की, घरात बारा दिवस क्वॉरनटाईन होतो. त्यानंतर माझा हा नवीन लूक आहे. मला आशा आहे की, तो तुम्हाला आवडेल, वसीमनं त्या फोटोमध्ये टकल केलेला दिसतो आहे. वास्तविक त्यानं विग लावला आहे हेही दिसुन येत आहे. मात्र त्याच्या चाहत्यांचे या फोटोमुळे चांगलेच मनोरंजन झालं आहे. आपल्या आवडत्या क्रिकेटरला क्वॉरनटाईन असताना टक्कल पडलं की काय असा प्रश्नही त्याच्या चाहत्यांनी विचारला आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी वसीमची हेअर स्टाईलही फार लोकप्रिय झाली होती.

loading image
go to top