esakal | पाकिस्तानमध्ये बॉलीवूडची हवा, 'इन्कलाब' ची क्लिप केली शेअर

बोलून बातमी शोधा

pakistan prime minister imran khan

पाकिस्तानमध्ये बॉलीवूडची हवा, 'इन्कलाब' ची क्लिप केली शेअर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - सध्या बॉलीवूडमध्ये कोरोनाची जबरदस्त साथ सुरु आहे. अनेक सेलिब्रेटींना कोरोनाची लागण झाली आहे. असे असताना दुसरीकडे शेजारील देश पाकिस्तानात बॉलीवूडमधील एका चित्रपटाच्या क्लिपवरुन वाद रंगल्याचे दिसून आला आहे. ती क्लिप पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी शेअर केली होती. आता त्यावरुन पाकिस्तानात राजकारण होत असल्याचे दिसून आले आहे. इम्रान खान यांनी ती क्लिप आपण नव्हे तर विरोधकांनी शेअर केल्याचे म्हटले आहे. त्यामाध्यमातून आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बॉलीवूडचा प्रसिध्द चित्रपट इन्कलाब चित्रपटातील एक प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला आहे. 1984 मधील चित्रपटातील ही क्लिप शेअर करताना इम्रान यांनी आपल्या बाबत हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी याविषयी अधिक माहिती देताना लिहिले आहे की, भ्रष्ट अधिकारी आणि माफिया यांच्यामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांना सामोरं जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकदा सरकावर लोकांनी प्रश्न उभे केले आहेत. अशावेळी नेमकं काय करावं असा सवाल माझ्या समोर असल्याची भावना इम्रान यांनी व्यक्त केली आहे.

इम्रान यांनी जी क्लिफ शेअऱ केली आहे त्याविषयी त्यांनी सांगितलं आहे की, त्यात भ्रष्ट राजकीय नेते आणि अधिकारी दिसत आहेत. त्यात कादर खान हे सरकारला चूकीच्या पध्दतीनं हटविण्याचं काम करत असल्याचे त्यात दाखविण्यात आले आहे. त्या क्लिपमध्ये असलेल्या कादर खान यांची तुलना इम्रान यांनी आपल्या विरोधी पक्षातील नेत्यांशी केली आहे. क्लिपमध्ये कादर खान सांगतात की, असं कुठं गीता मध्ये लिहिलं नाही की, जे सरकार आहे त्यालाच नेहमी सत्तेवर ठेवलं पाहिजे. आम्हालाही सरकार तयार करण्याचा पुरेपुर अधिकार आहे. त्यासाठी आम्हाला निवडणूक जिंकावी लागेल.

इम्रान खान यांच्यावर एका युझर्सनं टीका केली आहे त्याने लिहिलं आहे की, ते काही दिवस बॉलीवूडविषयी वाईट बोलत होते. आता आपल्या विरोधी पक्षांवर टीका करण्यासाठी त्यांना आमच्या बॉलीवूड चित्रपटांचा उपयोग करावा लागतो आहे. आता इम्रान खान यांनी इंस्टावरुन ती पोस्ट डिलिट केली असल्याने नेटक-यांनी त्यांना ट्रोल केले आहे.