वीना मलिककडून यहुदींवरील अत्याचाराचं समर्थन; ट्विट केलं हिटलरचं विधान

वादग्रस्त ट्विटनंतर वीना मलिक ट्रोल
Veena Malik and Hitler
Veena Malik and Hitler

सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये Israel Violenc मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटून आहेत. यात पाकिस्तानी अभिनेत्री वीना मलिकने Veena Malik यहुदींवर होत असलेल्या अत्याचाराचं समर्थन करणारं वादग्रस्त ट्विट केलं आहे. तिने हिटलरने Hitler ज्यूंच्या हत्येबाबत केलेल्या विधानाचा संदर्भ देत हा ट्विट केला आहे. यामुळे सोशल मीडियावर वीना मलिक ट्रोल होत आहे. (Pakistani movie star Veena Malik tweets Hitler quote about killing Jews)

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी या प्रकरणात तुर्कस्तान आणि सौदी अरेबियाशी बोलून यावर प्रतिक्रिया देऊ असं म्हटलं आहे. तर पाकिस्तानी अभिनेत्री असलेल्या वीना मलिकने अडॉल्फ हिटलरने केलेल्या ज्यूंच्या नरसंहाराचं समर्थन केलं आहे. वीनाने ट्विटमध्ये हिटलरचं वाक्य लिहिलं असून त्यात म्हटलंय की, ''मी सर्व ज्यूंना ठार करू शकलो असतो. पण काहींना जिवंत सोडलं कारण जगाला समजावं की मी इतर ज्यूंना का मारलं'' या ट्विटमुळे वीनाने पॅलेस्टाइन आणि इस्रायल यांच्या वादात होणाऱ्या मृत्यूंचं समर्थन केलं आहे.

वाढतं ट्रोलिंग पाहता वीनाने बुधवारी संध्याकाळी तिच्या अकाऊंटवरील सर्व ट्विट डिलिट केले. आता तिच्या अकाऊंटवर फक्त पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी इस्रायल- पॅलेस्टाइन संघर्षावर केलेलं ट्विट रिट्विट केलेलंच दिसत आहे.

हेही वाचा : 'शत्रूला शांत करणारच', इस्रायलचा पॅलेस्टाइनला इशारा

काय आहे इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधला नेमका वाद?

जेरुसलेममध्ये इस्रायली पोलस आणि पॅलेस्टाइनच्या नागरिकांमध्ये वाद झाल्यानंतर हमास आणि इस्रायलमध्ये हे युद्ध पेटले आहे. ही जागा ज्यू आणि मुस्लिम या दोघांसाठीही पवित्र आहे. इस्लायने जेरुसलेमचा पूर्व भाग १९६७ साली आपल्या ताब्यात घेतला होता. पण बहुतांश देशांना ते मान्य नव्हतं. पॅलेस्टिनी लोकांनी जेरुसलेमवर हक्क सांगितल्याने हा वाद चिघळला आहे. यामुळेच गेल्या काही दिवसांपासून जेरुसलेममधला तणाव वाढला आहे.

२०१४ मध्ये गाझामध्ये झालेल्या युद्धानंतर हमास आणि इस्राइल यांच्यातील हा सर्वांत मोठा संघर्ष असल्याचं दिसतंय. यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com